इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात नुकताच द केनिंग्टन ओव्हल स्टेडियम, लंडन येथे चौथा कसोटी सामना पार पडला आहे. पाहुण्या संघाने सांघिक प्रदर्शनांच्या जोरावर १५७ धावांनी हा सामना जिंकला आहे. यासह भारतीय संघ २-१ ने मालिकेत आघाडीवर आहे. यानंतर १० सप्टेंबरपासून उभय संघात पाचवा आणि मालिकेतील शेवटचा कसोटी सामना होणार आहे. मँचेस्टरमधील एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी मंगळवारी (०७ सप्टेंबर) भारतीय संघ मँचेस्टरला रवाना झाला आहे.
भारतीय संघातील बऱ्याचशा खेळाडूंनी आपल्या ओव्हल ते मँचेस्टरमधील प्रवासाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सर्व खेळाडू मेट्रो ट्रेनने मँचेस्टरला गेले आहेत. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याने आपल्या ट्वीटर अकाउंटवर प्रवासादरम्यानचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये साहासोबत सलामीवीर अभिमन्यु ईश्वरन, मयंक अगरवाल आणि कसोटीपटू चेतेश्वर पुजारा दिसत आहेत.
➡️Destination Next: Manchester📍 pic.twitter.com/zaNLMY4uyE
— Wriddhiman Saha (@Wriddhipops) September 7, 2021
साहाबरोबरच गोलंदाज मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेलनेही आपला एकत्र प्रवास करतानाचा फोटो शेअर केला आहे. ते दोघे यावेळी मस्ती करतानाही दिसत आहेत. प्रवासादरम्यान अक्षर डुलकी घेत असतानाचा एक फोटो त्याच्या सहकाऱ्याने काढला, जो अक्षरने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
Next destination:📍Manchester 👋🏻 pic.twitter.com/nXtvopmOoT
— Akshar Patel (@akshar2026) September 7, 2021
https://www.instagram.com/p/CThQcLZjAfv/?utm_source=ig_web_button_share_sheet
याखेरीज अष्टपैलू शार्दुल ठाकूर सलामीवीर रोहित शर्मा आणि कुंटुंबियासोबत एकत्र प्रवास करताना दिसला. रोहितची पत्नी रितीका सजदेहने त्याचा फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. तसेच उमेश यादवनेही आपल्या कुंटुंबीयांसोबत प्रवासाचा आनंद लुटला आहे.
https://www.instagram.com/p/CThFiH0F6uD/?utm_source=ig_web_button_share_sheet
दरम्यान भारतीय संघ सध्या चांगल्याच लयीत आहे. ओव्हल येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिनही विभागात प्रभावी प्रदर्शन केले आहे. पहिल्या डावात १९१ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर भारताने दुसऱ्या डावात ४६६ धावा उभारत इंग्लंडला विजयासाठी ३६८ धावांचे मोठे आव्हान दिले होते. यात रोहित शर्माने शतक आणि शार्दुल ठाकूर, रिषभ पंत व चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकांचा समावेश होता.
प्रत्युत्तरात इंग्लंडकडून केवळ सलामीवीर रॉरी बर्न्स आणि हसीब हमीद अर्धशतकी कामगिरी करु शकले. उमेश यादव (३ विकेट्स), जसप्रीत बुमराह (२ विकेट्स), शार्दुल ठाकूर (२ विकेट्स) आणि रविंद्र जडेजा (२ विकेट्स) यांच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडचा संघ फक्त २१० धावांवर गुंडाळला आणि भारताने ५० वर्षांनंतर ओव्हलवर विजय संपादन केला.
या विजयासह भारताने कसोटी मालिकेतील त्यांचा पराभव टाळला आहे. आता येता पाचवा कसोटी सामना जिंकत किंवा अनिर्णीत राखत मालिका खिशात घालण्याकडे भारताचा कल असेल. तर इंग्लंड संघ दमदार पुनरागमन करत मालिकेत बरोबरी करण्यासाठी प्रयत्नशील असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
कोहलीच्या नेतृत्वापासून ते रोहितच्या शतकापर्यंत, ‘ही’ आहेत ऐतिहासिक विजयामागील ५ प्रमुख कारणे
‘त्याच्यामुळे सामन्यात फरक पडला’, विराटने रोहितला नव्हे, तर ‘या’ खेळाडूला दिले विजयाचे श्रेय
मँचेस्टर कसोटीत ‘हिटमॅन’ मैदानात उतरणार का? दुखापतीबाबत स्वतः रोहित शर्माने दिली मोठी अपडेट