आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी गरूडझेप घेतली आहेत. नुकतीच भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका खेळली गेली. ही मालिका जिंकणे भारताला शक्य झाले नाही. पण संघातील खेळाडूंनी मंगळवारी (9 जानेवारी) जाहीर झालेल्या ताच्या कसोटी क्रमवारीत स्वतःचे स्थान उंचावले. भारतीय दिग्गज विराट कोहली याने पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम याची सहाव्या क्रमांकाची गादी स्वतःसाठी रिकामी केली.
विराट कोहली कसोटी क्रमवारीत सध्या 775 रेटिंग गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. विराटने मागच्या आठवड्यात झालेल्या केपटाऊन कसोटीत अनुक्रमे 46 आणि 12 धावांची खेळी केली होती. दोन दिवसांमध्ये संपलेल्या या कसोटी सामन्यात भारतीय संघ 7 विकेट्स राखून जिंकला. दुसरीकडे बाबर आझम दोन स्थानांच्या नुकसानासह आठव्या क्रमांकावर घसरला आहे. बाबरकडे सध्या 768 गुण आङेत. बाबर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातही छाप सोडू शकला नाही.
तसेच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा सर्वोत्तम 10 फलंदाजांमध्ये पोहोचला आहे. रोहित केपटाऊन कसोटीतील प्रदर्शनानंतर 748 गुणांसह कसोटी फलंदाजांमध्ये 10व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याला चार स्थानांचा लाभ झाला. त्याने केपटाऊनमध्ये 39 आणि 16* असे प्रदर्शन केले होते.
कसोटी क्रमावारीत पहिल्या क्रमांकावर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (864) कायम आहे. इंग्लंडचा जो रुट (859) यादीत दुसऱ्या क्रमांकावर, तर ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टीव स्मिथ (818) तिसऱ्या क्रमांकावर आहे. कसोटी फलंदाजांच्या यादीत चौथा कर्मांक ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅबुशेन (802) याचा आहे. न्यूझीलंडचा डेरिल मिचेल (786) पाचव्या क्रमांकावर आहे. मिचेलला एका स्थानाचे नुकसान झाले. यातील सध्या ननव्या क्रमांकावर असणार उस्मान ख्वाजा (785) याने चार स्थानाचे नुकसान सहन केले आहे.
कसोटी गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद सिराज (661) 17व्या स्थानी पोहोचला आहे. वेगावन गोलंदाज सिराजने केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात 6 विकेट्स घेतल्या होत्या. जसप्रीत बुमराह (787) सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. बुमरहा केपटाऊनमध्ये खेळताना कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेऊ शकला होता. दक्षिण आप्रिकेचा कागिसो रबाडा (851) तिसऱ्या आणि रविंद्र जडेजा (774) पाचव्या क्रमांकावर आहे. जडेजाला एका स्थानाचे नुकसान झाले. भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन 863 गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
महत्वाच्या बातम्या –
Mumbai Cricketer Dies: मुंबईच्या दिग्गज क्रिकेटरचा बॉल लागून मृत्यू, मैदानावरच घेतला अखेरचा श्वास
Ind vs SA Capetown Test: रोहितने विजय मिळवलेल्या पीचवर ICC ची मोठी कारवाई, उचलले ‘हे’ पाऊल