---Advertisement---

2023 । सरत्या वर्षात दिसला भारतीयांचा जलवा, पाहा कोणत्या पाच खेळाडूंनी केल्या सर्वाधिक धावा

On: शुक्रवार, डिसेंबर 22, 2023 4:21 PM
Shreyas Iyer Virat Kohli
---Advertisement---

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिका गुरुवारी (21 डिसेंबर) संपन्न झाली. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना भारताने 78 धावांनी जिंकली आणि मालिका 1-2 अशा अंतराने नावावर केली. भारतीय संघाला आता चालू वर्षात एकही वनडे सामना खेळायचा नाहीये. असात वर्षभरात सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या फलंदाजांची नावेही निश्चित झाली आहेत. आपण या लेखात भारतीय संघासाठी 2023 मध्ये सर्वाधिक वनडे धावा करणाऱ्या पाच फलंदाजांवर नजर टाकू.

भारतीय संघासाठी 2023 वर्ष समाधानकारक ठरले. वनडे विश्वचषक जिंकण्यासाठी भारत प्रबळ दावेदार मानला जात होता. पण उपविजेतेपदावर संघाला समाधान मानावे लागले. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्याव्यतिरिक्त आशिया चषक देखील यावर्षी वनडे फॉरमॅटमध्ये खेळला गेला. विश्वचषक आणि आशिया चषकात भारताला विजेतेपद मिळाले नाही. पण एकंदरीत विचार केला, तर संघआचे प्रदर्शन समधानकार होते. दरम्यानच्या काळात भारताने श्रीलंका, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्धच्या वनडे मालिका जिंकल्या. मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धच्या वनडे मालिकेत मात्र भारताला पराभव मिळाला होता. एकंदरीत विचार केला, तर भारताने यावर्षी एकूण 35 वनडे सामने खेळले, ज्यापैकी 27 सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. 7 सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला.

संघातील खेळाडूंमध्ये शुबमन गिल याचे प्रदर्शन सर्वोत्तम राहिले. शुबमन गिल (Shubman Gill) याने 2023 मध्ये 29 वनडे सामने खेळले आणि यात सर्वाधिक 1584 धावा केल्या. यादीत दुसऱ्या क्रमांकावर दिग्गज विराट कोहली (Virat Kohli) आहे. विराटने सरत्या वर्षात खेळलेल्या 27 वनडे सामन्यांमध्ये 1377 धावा केल्या आहेत. 27 सामन्यांमध्ये 1255 धावा कर्णादार रोहित शर्मा (Rohit Sharma) या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. केएल राहुल (KL Rahul) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी यादीत अनुक्रमे चार आणि पाचवा क्रमांक मिळवला आहे. राहुलने 27 सामन्यात 1060, तर अय्यरने 20 सामन्यात 846 धावा केल्या आहेत. (Indian players with most ODI runs in 2023)

2023 मध्ये सर्वाधिक वनडे धावा करणारे भारतीय फलंदाज
शुबमन गिल – 1584 (29 सामने)
विराट कोहली – 1377 (27 सामने)
रोहित शर्मा – 1255 (27 सामने)
केएल राहुल – 1060 (27 सामने)
श्रेयस अय्यर – 876 (20 सामने)

दरम्यान, भारतीय संघ संध सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका जिंकल्यानंतर उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना 26 डिसेंबर म्हणजेच बॉक्सिंग डे दिवशी सुरू होईल. तसेच दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 3 ते 7 जानेवारीदरम्यान खेळला जाईल.

महत्वाच्या बातम्या – 
IPL 2024: कसं शक्य आहे! लिलावात मिळाले २० लाख, पण प्रत्यक्ष मिळणार ५० लाख
IND vs SA: व्हिडीओ व्हायरलः शतकवीर संजू सॅमसनने हटक्या पद्धतीने केले सेंच्युरी सेलीब्रेशन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---