१९ सप्टेंबरपासून इंडियन प्रीमीयर लीगच्या १३ व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. या मोसातील साखळी सामन्यांचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहे. या मोसमातील पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात अबुधाबी येथे पार पडणार आहे.
मागील मोसमापासून दिल्ली कॅपिटल्स या नावाने खेळणाऱ्या संघाचे नेतृत्व यावर्षीही श्रेयस अय्यर करणार आहे. यावर्षी दिल्ली संघाकडून आर अश्विन, अजिंक्य रहाणे असे अनुभवी खेळाडू खेळणार आहेत. तसेच शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टोयनिस आणि अॅलेक्स कॅरे असे काही परदेशी स्टार खेळाडूही दिल्ली संघात आहेत. दिल्लीने मागीलवर्षी २०१२ नंतर पहिल्यांदाच प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता.
यावर्षी आयपीएलमधील दिल्लीचा पहिला सामना २० सप्टेंबरला दुबई येथे किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध होणार आहे.
आयपीएलचा हा १३ वा मोसम यावर्षी ५३ दिवसांचा असणार आहे. १९ सप्टेंबर ते ३ नोव्हेंबर पर्यंत या आयपीएल मोसमातील साखळी सामने पार पडतील. त्यानंतर प्लेऑफचे सामने सुरु होतील प्लेऑफच्या सामन्यांचे वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही.
तसेच यावर्षी आयपीएलमध्ये १० डबल हेडर (एका दिवसात दोन सामने) होणार आहेत. डबल हेडरच्या दिवशी दुपारचे सामने ३.३० वाजता सुरु होतील आणि संध्याकाळचे सामने ७.३० वाजता सुरु होतील.
असे आहे आयपीएल २०२० मधील दिल्ली कॅपिटल्स संघाच्या साखळी सामन्यांचे वेळापत्रक-
२० सप्टेंबर,रविवार: दिल्ली विरुद्ध पंजाब, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२५ सप्टेंबर, शुक्रवार: चेन्नई विरुद्ध दिल्ली, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२९ सप्टेंबर, मंगळवार: दिल्ली विरुद्ध हैद्राबाद, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
३ ऑक्टोबर: शनिवार: दिल्ली विरुद्ध कोलकाता, शारजहा, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
५ ऑक्टोबर: सोमवार: बेंगलोर विरुद्ध दिल्ली, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
९ ऑक्टोबर: शुक्रवार: राजस्थान विरुद्ध दिल्ली, शारजहा, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
११ ऑक्टोबर: शनिवार: मुंबई विरुद्ध दिल्ली, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१४ ऑक्टोबर: सोमवार: दिल्ली विरुद्ध राजस्थान, दुबई , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१७ ऑक्टोबर: गुरुवार: दिल्ली विरुद्ध चेन्नई, शारजहा, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२० ऑक्टोबर: शनिवार: पंजाब विरुद्ध दिल्ली, दुबई , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२४ ऑक्टोबर: सोमवार: कोलकाता विरुद्ध दिल्ली, आबुधाबी , दुपारी ३ वाजून ३० मिनीटांनी
२७ ऑक्टोबर: सोमवार: हैद्राबाद विरुद्ध दिल्ली , दुबई , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
३१ ऑक्टोबर: शनिवार: दिल्ली विरुद्ध मुंबई, दुबई, दुपारी ३ वाजून ३० मिनीटांनी
२ नोव्हेंबर: सोमवार: दिल्ली विरुद्ध बेंगलोर, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
आयपीएल 2020 साठी असा आहे दिल्ली कॅपिटल्सचा संघ-
श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, शिखर धवन, रिषभ पंत, इशांत शर्मा, अमित मिश्रा, अवेश खान, संदीप लामिछाने, कागिसो रबाडा, कीमो पॉल, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आर अश्विन, अजिंक्य रहाणे, शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टोईनिस, अलेक्स कॅरी, मोहित शर्मा, तुषार देशपांडे, ललित यादव.