इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाचे वेध आता सर्वांनाच लागले आहेत. मागील महिन्यातच या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला होता. त्यानंतर सर्व संघांनी या हंगामासाठी तयारी सुरु केली आहे. त्यातच आता अशी चर्चा आहे की आयपीएलचा हा हंगाम पुढील महिन्या सुरु होणार असून भारतातच होईल.
इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल २०२१ चा हंगाम भारतात ६ स्टेडियमवर ९ एप्रिल ते ३० मे दरम्यान पार पडेल. तसेच ५२ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेतील एकूण ६० सामने अहमदाबाद, मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई आणि बंगळुरु येथे होण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयने काहीदिवसांपूर्वीच सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीचे आणि विजय हजारे ट्रॉफीचे यशस्वी आयोजन भारतात केले आहे. तसेच सध्या इंग्लंडविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय मालिकाही भारतात सुरु आहेत. या स्पर्धा जैव-सुरक्षित वातावरणात होत आहेत. त्यानुसार आयपीएलचा १४ वा हंगामाही अशाच वातावरणात होईल.
याआधी मागीलवर्षी कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे आयपीएलचा १३ वा हंगाम युएईमध्ये घेण्यात आला होता. मात्र भारतात यंदा अन्य स्पर्धांचे आयोजन यशस्वी ठरत असल्याने आयपीएल हंगामही भारतातच होण्याची दाट शक्यता आहे. तरी अजून याबद्दल बीसीसीआय किंवा आयपीएलकडून कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
आशिष नेहराचा ऑटोग्राफ घेत असलेल्या ‘त्या’ युवकाला ओळखलं का? आहे भारताचा मॅच विनर खेळाडू
कसोटी चॅम्पियनशीप: भारताचं फायनलचं तिकीट पक्क! लॉर्ड्सवर न्यूझीलंडविरुद्ध करणार दोन हात