शनिवारी (१९ सप्टेंबर) सुरु झालेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामात पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सवर शानदार विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात रविवारी दिल्ली कॅपिटल्स संघाने किंग्ज ११ पंजाब संघावर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने सनरायझर्स संघावर १० धावांनी विजय मिळविला. आज (२२ सप्टेंबर) झालेल्या चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघावर १६ धावांनी विजय मिळविला.
या चार सामन्यानंतर आयपीएलची गुणतालिका अर्थात पॉईंट टेबल
१- राजस्थान रॉयल्स : (सामना 1, विजय 1, पराभव 0, गुण 2, नेट रन रेट +0.800)
२- रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू : (सामना 1, विजय 1, पराभव 0, गुण-2, नेट रन रेट +0.500)
३- दिल्ली कॅपिटल्स : (सामना 1, विजय 1, पराभव 0, गुण 2, नेट रन रेट 0.000)
४- चेन्नई सुपरकिंग्ज : (सामने 2, विजय 1, पराभव 1, गुण 2, नेट रन रेट -0.145)
५- किंग्स XI पंजाब : (सामना 1, विजय 0, पराभव 1, गुण 0, नेट रन रेट – 0.000)
६- कोलकाता नाइट रायडर्स : (सामने-0, विजय-0, पराभव-0, गुण-0)
७- मुंबई इंडियन्स: (सामना 1, विजय 0, पराभव 1, गुण 0, नेट रन रेट -0.486)
८- सनरायझर्स हैदराबाद : (सामने 1, विजय 0, पराभव 1, गुण 0, नेट रन रेट -0.500)