इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामाचा अंतिम सामना जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (२९ मे) गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. हा सामना गुजरात टायटन्स संघाने ७ विकेट्स जिंकत आयपीएलच्या १५ व्या हंगामाचे विजेतेपेद जिंकले.
इतिहासात आयपीएलच्या १५ विजेतेपदांपैकी ५ मुंबई इंडियन्स, ४ चेन्नई सुपर किंग्सने, २ कोलकाता नाईट रायडर्सने, प्रत्येकी १ राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैद्राबाद, डेक्कन चार्जर्स आणि गुजरात टायटन्सने विजेतेपदं जिंकली आहेत.
आयपीएल म्हटलं की क्रिकेट प्रेमींसाठी खऱ्या अर्थाने क्रिकेटचा सोहळाच असतो. या स्पर्धेने अनेक देश विदेशातील खेळाडूंची जगाला ओळख करून दिली तसेच काही खेळाडूंना मालामाल केले. अनेक खेळाडू गरिब परिस्थीतून आले, ज्यांनी त्यांची या स्पर्धेमुळे जगाला दखल घ्यावी लागली.
असे असले तरी या मानाच्या ट्राॅफीवर नक्की काय लिहीले आहे किंवा ते कोणत्या भाषेत आहे याबद्दल मात्र जास्त कुणाला काही माहीत नाही. या सोनेरी ट्राॅफीवर याच सर्व कारणामुळे ‘यत्र प्रतिभा अवसरा प्रापनोती’ असे संस्कृत भाषेत लिहीले आहे. याचा मराठीमध्ये अर्थ होता ‘जिथे प्रतिभा असेल तिथे संधी प्राप्त होते.’
याचा इंग्लिश भाषेत अर्थ Where talent meets opportunity आणि हिंदी भाषेत जहां प्रतिभा अवसर प्राप्त करती है ।” असा अर्थ होतो.
या ट्राॅफीवर गतविजेत्या संघांची नावे आणि त्यांनी कोणत्या वर्षात ही कामगिरी केली आहे हेही लिहीले जाते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ ५ गोष्टींमुळे गुजरात टायटन्सने जिंकली IPL 2022 ची ट्रॉफी, वाचा विजयामागची कारणे
‘सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या, पण…’ अनेक विक्रम तोडूनही बटलर ‘या’ कारणाने निराश