प्रतिष्ठित अशा इंडियन प्रीमियर लीग २०२०चा अंतिम सामना अवघ्या काही दिवसांवर आला आहे. फार पूर्वीच रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्स संघ थाटात अंतिम सामन्यात पोहोचला आहे. सोबतच रविवारी (८ नोव्हेंबर) अबु धाबीतील सामन्यात सनरायझर्स हैदराबादला १७ धावांनी नमवत दिल्ली कॅपिटल्सनेही अंतिम सामना गाठला. पण त्यापूर्वीच चाहत्यांच्या मनात एक प्रश्न घोंगावत आहे. तो म्हणजे, अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला नक्की किती रुपयांचे बक्षीस मिळेल?.
माध्यमातील वृत्तानुसार, कोरोना व्हायरसमुळे बीसीसीआयने मार्च महिन्यापासून खर्चात कपात करायला सुरुवात केली होती. त्यामुळे आयपीएल २०२०च्या हंगामाची सुरुवात होण्यापुर्वीच बीसीसीआयने आयपीएलच्या बक्षीसांच्या किंमती गतवर्षीच्या रक्कमेच्या तुलनेत अर्ध्या करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यामुळे यावर्षीच्या विजेत्या संघाला गतवर्षीच्या रक्कमेपेक्षा अर्धी रक्कम म्हणजेच १० कोटी रुपये मिळू शकतात. कारण गतवर्षी विजेत्या संघाला २० कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले होते. तर उपविजेत्या संघाला ६.२५ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. उपविजेत्या संघाला आयपीएल २०१९मध्ये तब्बल १२.५० कोटी रुपये मिळाले होते. याव्यतिरिक्त क्वालिफायर सामन्यात पराभूत झालेल्या संघांना प्रत्येकी ४.३७५ कोटींचे बक्षीस दिले जाईल.
मात्र हंगामात सर्वाधिक धावा करणारे ऑरेंज कॅपचे मानकरी आणि सर्वाधिक विकेट्स घेणारे पर्पल कॅपचे मानकरी यांना किती रुपये मिळतील, हे अद्याप ठरेलेले नाही. आयपीएल २०१९मध्ये हा पराक्रम करणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी १० लाख रुपये मिळाले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
व्वा रे गब्बर! हैदराबादच्या गोलंदाजांना दिवसा तारे दाखवत धवनकडून सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
विक्रमवीर शिखर धवनच्या पारड्यात नव्या ‘रेकॉर्डची’ भर; रोहित-डिविलियर्सलाही टाकले मागे
आयपीएल २०२० लिलावात ‘हे’ काम करताच मुंबईला सापडली यशाची किल्ली!
ट्रेंडिंग लेख-
लईच वाईट! आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ‘फ्लॉप’ ठरलेले ३ भारतीय खेळाडू
RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ