---Advertisement---

हा दिग्गज म्हणतोय, जर मोदींनी धोनीला संपर्क करून टी-२० विश्वचषकात खेळण्यास सांगितले, तर…

On: गुरूवार, ऑगस्ट 20, 2020 10:48 PM
---Advertisement---

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने एमएस धोनीबद्दल धक्कादायक विधान केले आहे. एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे, पण शोएब अख्तर म्हणाला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धोनीला संपर्क करून टी-२० विश्वचषकात खेळण्यास विनंती करू शकतात.

शोएब अख्तर याने ‘बोल वसीम’ या यूट्यूब वाहिनीवर एमएस धोनीच्या निवृत्तीवर असे भाष्य केले. तो म्हणाला की, माझ्या मतानुसार एमएस धोनी अजून टी-२० क्रिकेट खेळू शकतो तसेच तो टी-२० विश्वचषक देखील खेळू शकतो. भारतीय चाहते आपल्या स्टार खेळाडूंवर ज्या पद्धतीने प्रेम करतात आणि त्याचे समर्थन करतात ते पाहून धोनी अजून टी-२० क्रिकेटमध्ये खेळू शकला असता. पण हा धोनीचा वैयक्तिक निर्णय होता.

एमएस धोनीने आपल्या कारकिर्दीतील सर्वकाही मिळवले आहे – शोएब अख्तर

शोएब पुढे म्हणाला की, एमएस धोनीने आपल्या कारकीर्दीतील प्रत्येक गोष्ट साध्य केली. रांचीमधील एका गावातील या मुलाने भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात आपला चाहता वर्ग तयार केला. भारतासारखा देश धोनीला कधीही विसरणार नाही. त्याला निश्चितपणे फेअरवेल सामना देण्याची भारताला इच्छा असेल. जर धोनीला नको असेल तर ती वेगळी गोष्ट आहे, पण त्याला फेअरवेल सामना खेळताना बघायला भारतीय चाहत्यांना नक्की आवडेल.

त्यानंतर शोएब अख्तरने आणखी एक धक्कादायक विधान केले. तो म्हणाला, असेही होऊ शकते कि, भारताचे पंतप्रधान त्याला संपर्क करून टी-२० विश्वचषकात खेळण्यास सांगतील. १९८७ मध्ये इम्रान खान यांना जनरल झिया-उल-हक यांनी क्रिकेट सोडू नका असे सांगितले होते आणि तुम्ही पंतप्रधानांना नकार देऊ शकत नाही.

एमएस धोनीने १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या निर्णयामुळे धोनीचे चाहते निराश झाले, तर अनेक क्रिकेट दिग्गजांनी त्याला शुभेच्छा दिल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---