युवा भारतीय बॅडमिंटनपट्टू सात्विक साईराज व चिराग शेट्टी या जोडीने इंडोनेशियन ओपन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचे विजेतेपद आपल्या नावे केले आहे. अशी कामगिरी करणारी ही पहिलीच भारतीय जोडी ठरली. यापूर्वी कोणत्याही भारतीय दुहेरी जोडीने 1000 वर्ल्ड टूर सुपर स्पर्धा जिंकलेली नव्हती.
https://www.instagram.com/p/CtoH8sKojik/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
इंडोनेशियन ओपन ही बॅडमिंटन जगतातील मानाची स्पर्धा मानली जाते. भारताचे अव्वल पुरुष दुहेरी खेळाडू असलेले सात्विक व चिराग यांनी उपांत्य फेरीचा सामन्यात अव्वल मानांकित जोडीला पराभूत करत अंतिम फेरीत जागा मिळवली होती. त्यामुळे अंतिम फेरीत त्यांचे पारडे काहीसे जड होते.
अंतिम फेरीत या जोडीसमोर मलेशियाच्या चिया व सोह या जोडीचे आव्हान होते. भारतीय जोडीने अंतिम सामन्यात या जोडीला प्रतिकार करण्याची संधी दिली नाही. त्यांना 21-17, 21-18 असे पराभूत करत त्यांनी विजेतेपद आपल्या नावे केले. 2018 पासून सुरू झालेल्या 1000 वर्ल्ड टूर सुपर स्पर्धेत कोणत्याही भारतीय जोडीने आतापर्यंत विजेतेपद पटकावले नव्हते. या विजयानंतर सात्विक व चिराग यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
(Indian Shuttlers Satwik Sairaj And Chirag Shetty Win Indonesia Open Double Title)
महत्वाच्या बातम्या-
रणजीत 7 सामन्यात 50 विकेट्स, तरीही दुलीप ट्रॉफीत मिळाली नाही संंधी; गोलंदाज म्हणाला, ‘भारतात…’
धोनीबाबत धक्कादायक ब्रेकिंग! 2011 वर्ल्डकप फायनलमध्ये युवराजआधी फलंदाजीला येण्याचा केला खुलासा