भारताने 2022 यावर्षी बॅडमिंटनमध्ये जगाला आपली ताकद दाखवली आहेे. थॉमस कप पासून राष्ट्रकुल खेळांमध्ये देखील भारतीय खेळाडूंचे वर्चंस्व राहिले. पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी यांच्या जोरावर भारतीय खेळाडूंनी बीडब्ल्यूएफ टूरमध्ये 6 वैयक्तिक किताब जिंकले. दोन वेळची ऑलिंपिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूने 3 किताब आपल्या झोळीत टाकले. यात स्वीस ओपन सुपर 300, सिंगापूर ओपन सुपर 500 आणि सैयद मोदी इंटरनॅशनल या स्पर्धांचा समावेश आहे. याचबरोबर बर्घिंगम राष्ट्रकुल खेळांमध्ये देखील तिने सुवर्ण पदक जिंकले होते.
पीव्ही सिंधू बरोबरच भारतीय पुरुष खेळाडूंनी देखील हे वर्ष विस्मरणीय बनवले आहे. बॅंकॉक याठिकाणी आयोजित केलेल्या थॉमस कप या स्पर्धेतील चीन आणि इंडोनेशिया यांचे वर्चस्व कमी केेले. लक्ष्य सेेन याने आपला पहिला-वहिला सुपर 500 किताब जिंकला आणि राष्ट्रकुल खेळांमध्ये देखील सुवर्णपदक जिंकले. याशिवाय त्याने आणखी दोन स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
सात्विक आणि चिरागसाठी ऐतिहासिक वर्ष
सात्विक आणि चिरागसाठी हे वर्ष अविस्मरणीय होते. त्यांनी वर्ल्ड टूरमध्ये जिंकलेल्या 2 किताब आणि राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये पहिल्यांदा कांस्यपदक जिंकले. सेन आणि सात्विक-चिराग यांनी इंडियन ओपन सुपर 500मध्ये किताबाने शुभारंभ केला. पुलेला गोपीचंद यांच्यानंतर इंग्लंड चॅंपियनशिपच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवणारा लक्ष्य सेन भारताचा पहिला पुरुष खेळाडूू ठरला. तो जर्मन ओपनच्या अंतिम सामन्यात देखील पोहोचला होता.
थॉमस कप जिंकत रचला इतिहास
भारतीय संघाने मे महिन्यात थॉमस कप जिंकत इतिहास रचला. एसएच प्रणय आणि किदांबी श्रीकांत यांच्या नेतृत्वात भारताने पहिल्यांदा हा किताब जिंकला. त्यानंतर राष्ट्रकुल खेळांमध्ये 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य असे एकूण 6 पदक जिंकले.
सिंधूची ‘सुवर्णप्रतिक्षा’ संपली
सिंधूची राष्ट्रकुल खेळांमध्ये सुवर्णपदकाची प्रतिक्षा संपली. तसेच सेन आणि सात्विक-चिराग या जोडीने देखील सुवर्णपदक मिळवले. सात्विक-चिराग या जोडीने यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकत इतिहास रचला. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी ही पहिली भारतीय पुरुष जोडी बनली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडिया चारीमुंड्या चीत! अखेरच्या टी20 सह मालिका पाहुण्यांच्या खिशात
करा कष्ट, राहा धष्टपुष्ट! शिखर धवनचा जिममधील व्हिडिओ व्हायरल, संघात पुनरागमनाची अपेक्षा