---Advertisement---

करा कष्ट, राहा धष्टपुष्ट! शिखर धवनचा जिममधील व्हिडिओ व्हायरल, संघात पुनरागमनाची अपेक्षा

Shikhar dhawan gym video
---Advertisement---

भारतीय संघ आपला शेवटचा कसोटी सामना बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. हा कसोटी सामना 22 ते 26 डिसेंबर दरम्यान खेळवला जाईल. हा दौर संपल्यानंतर 2023च्या सुरुवातीला श्रीलंका संघ भारतात दौऱ्यासाठी येणार आहे. या दौऱ्यावर श्रीलंंका संघ 3 टी20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. श्रीलंकेचा हा दौरा 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे. भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज शिखर धवन याला एकदिवसीय संघात स्थान मिळण्याची पूर्ण अपेक्षा आहे. या मालिकेसाठी त्याने कठोर मेहनत घ्यायला सुरुवात केली आहे, ज्याचा व्हिडिओ त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला.

https://www.instagram.com/reel/CmX_ozvqKai/?utm_source=ig_web_copy_link

शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या सध्याच्या फॉर्मबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे सध्या त्याचे प्रदर्शन खराब आहे. बांगलादेश विरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत त्याच्या बॅटमधून जास्त धावा निघाल्या नाहीत. खेळवल्या गेलेल्या तीन सामन्यांमध्ये त्याने फक्त 15 धावा केेल्या. अशा खराब प्रदर्शनानंतर बऱ्याच माजी खेळाडूंनी आणि चाहत्यांनी त्याच्यावर टीका केली होती. परंतू धवन श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेसाठी खूप परिश्रम घेत आहे. याचा व्हिडिओ त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट शेअर केला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलय की, “परिश्रम आणि कधीही हार मानू नका.”

जर भारताला एकदिवसीय सामन्यात 325-350 धावा करायच्या असतील तर धवनला संघात स्थान नाही- सबा करीम
बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात शिखर धवन याला ईशान किशन याच्यासोबत सलामीला संधी देण्यात आली होती, ज्यामध्ये त्याला फक्त 3 धावा करता आल्या. दुसऱ्या बाजुला किशन याने धमाकेदार खेळी करत 210 धावा ठोकल्या. त्याच्या या खेळीमुळे त्याने भारतीय संघात आपली दावेदारी उभी केली आहे.

याच मुद्द्यावर भारतीय संघाचे माजी खेळाडू सबा करीम यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की जर संघ व्यवस्थापन एकदिवसीय सामन्यात 257-300 धावांचे लक्ष्य ठेवत असेल तर धवनला संघात ठेवले पाहिजे. त्यांच्यानुसार धवन सुरुवातीला जास्त डॉट चेंडू खेळतो, ज्यामुळे संघाची धावगती कमी होते आणि जर आपल्याला 325-350 धावसंख्या करायची असेल तर धवनची संघात जागा बनत नाही.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्जुन नक्कीच यशस्वी क्रिकेटपटू होणार! सचिनच्याच शिष्याने व्यक्त केला विश्वास
नागपूरने पुण्याचा पराभव करत पटकावले आंतर-जिल्हा फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---