भारत विरुद्ध आयर्लंड संघातील 3 सामन्यांची टी20 मालिका बुधवारी (दि. 23 ऑगस्ट) संपुष्टात आली. पावसाने व्यत्यय आणल्यामुळे मालिकेतील तिसरा सामना रद्द झाला. मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकल्यामुळे भारताने ही मालिका 2-0ने आपल्या नावावर केली. या मालिकेतील शानदार प्रदर्शनासाठी कर्णधार जसप्रीत बुमराह याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. अशात तिसरा सामना रद्द झाल्यानंतर जसप्रीत बुमराहने प्रतिक्रिया दिली. चला तर जाणून घेऊयात, बुमराह नेमका काय म्हणाला आहे…
काय म्हणाला बुमराह?
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) म्हणाला की, “मैदानावर पुनरागमन करून चांगले वाटत आहे. सामन्यासाठी दीर्घकाळ सतत वाट पाहणे कंटाळवाणे असते. आज सकाळी वातावरण चांगले होते, पण यानंतर पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.” याव्यतिरिक्त कर्णधारपदाविषयी तो म्हणाला की, “भारतीय संघाचे नेतृत्व करणे अभिमानास्पद आहे. आमच्या संघातील सर्व खेळाडू उत्साही आहेत. तुम्हाला जेव्हाही संधी मिळेल, प्रदर्शन करावे लागेल. एक क्रिकेटपटू म्हणून तुम्हाला नेहमी जबाबदारी घ्यावी वाटते.”
A special comeback! 💪#TeamIndia Captain @Jaspritbumrah93 led from the front with the ball & he receives the Player of the Series award 👏👏
India win the series 2⃣-0⃣ #IREvIND pic.twitter.com/iS6NxKvy0Z
— BCCI (@BCCI) August 23, 2023
बुमराहचे प्रदर्शन
या मालिकेतील 2 सामने खेळले. या सामन्यांमध्ये बुमराहच्या वेगवान गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली. त्याने पहिल्या टी20 सामन्यात 4 षटके गोलंदाजी करताना 24 धावा खर्चून 2 विकेट्स नावावर केल्या होत्या. याव्यतिरिक्त दुसऱ्या सामन्यात बुमराहने 4 षटके गोलंदाजी करत 15 धावा खर्चून पुन्हा 2 विकेट्स घेतल्या होत्या.
भारताने 2-0ने जिंकली मालिका
विशेष म्हणजे, भारत विरुद्ध आयर्लंड संघातील तिसऱ्या टी20 सामन्याच्या दिवशी डब्लिन येथे सातत्याने पाऊस पडत राहिला. त्यामुळे पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे भारत-आयर्लंडमधील तिसरा सामना एकही चेंडू न फेकता रद्द करावा लागला. मात्र, यामुळे भारताने 3 सामन्यांची टी20 मालिका 2-0ने आपल्या नावावर केली. भारताने पावसाचा व्यत्यय येऊनही पहिला सामना डकवर्थ लुईस नियमानुसार 2 धावांनी जिंकला होता. तसेच, दुसऱ्या सामन्यात आयर्लंडला 33 धावांनी पराभवाचा धक्का दिला होता. (indian skipper jasprit bumrah on comeback ind vs ire t20 read here)
हेही वाचा-
‘तो हार्दिकचा बॅकअप बनूच शकत नाही’, म्हणत Asia Cup 2023पूर्वी गंभीरचा CSKच्या स्टार खेळाडूला पाठिंबा
पावसामुळे तिसरा सामना रद्द! 2-0 ने मालिका टीम इंडियाच्या नावे, बुमराह मालिकावीर