वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात बुधवारपासून (12 जुलै) डॉमिनिका येथील विंडसर पार्क मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय सलामीवीर रोहित शर्मा व यशस्वी जयस्वाल यांनी आपली दमदार फलंदाजी सुरू ठेवली. आपला पहिला सामना खेळत असलेल्या यशस्वी जयस्वाल याने दुसऱ्या सत्रात शतक केल्यानंतर, कर्णधार रोहितने देखील आपले शतक पूर्ण केले.
पहिल्या दिवशी 30 धावांवर नाबाद असलेल्या रोहितने दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात काहीसा सावध खेळ दाखवला. यादरम्यान त्याने आपले पंधरावे अर्धशतक पूर्ण केले. लंच नंतर दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात झाल्यावर त्याने काहीसा आक्रमक पवित्रा घेत चौकार षटकार वसूल केले. एका बाजूने यशस्वी जयस्वाल चांगली फलंदाजी करत असतात त्याने साथ देण्याचे काम केले.
जयस्वालने शतक पूर्ण केल्यानंतर रोहितने देखील फारसा वेळ न घालवता दोन चौकार ठोकत आपल्या कसोटी कारकिर्दीतील पंधरावे शतक झळकावले. मात्र, यानंतर पुढच्या चेंडूवर तो बाद होऊन परतला. बाद होण्यापूर्वी त्याने 221 चेंडूवर 103 धावांची खेळी केली. यामध्ये 10 चौकार व 2 षटकारांचा समावेश होता. त्याने यशस्वीसह भारतासाठी 229 धावांची सलामी दिली. वेस्ट इंडीजविरूद्ध भारतीय सलामीवीरांनी दिलेली ही सर्वात मोठी सलामी आहे.
बातमी अपडेट होत आहे
(Indian Skipper Rohit Sharma Hits Century Against West Indies In Dominica Test)
महत्वाच्या बातम्या –
भारतीय संघात असे काही पहिल्यांदाच! शुबमन गिलच्या ‘या’ निर्णयामुळे माजी क्रिकेटपटू हैराण
मैदानावर होती विंडीजची शेवटची जोडी, अचानक नाचायला लागला शुबमन; डान्स कॅमेऱ्यात कैद