भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात एकतर्फी पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाने दुसरा वनडे सामना आणि मालिकादेखील गमावली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ३८९ धावांची मोठी धावसंख्या रचली होती. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ९ विकेट्स गमावत ३३८ केल्या. मालिका गमावल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली अत्यंत निराश दिसत होता. त्याने सामन्यानंतर कबूल केले की, ऑस्ट्रेलियन संघाने त्याच्या संघाला सर्व आघाड्यांवर चित केले.
गोलंदाज प्रभावी कामगिरी करू शकले नाहीत
विराट कोहली एक कधीही हार न मानणारा खेळाडू म्हणून ओळखला जातो. परंतु सलग दुसऱ्या पराभवानंतर तो खूप व्यथित झालेला दिसला. सामन्यानंतर बोलताना विराट म्हणाला, “ऑस्ट्रेलियाने आम्हाला सर्व आघाड्यांवर चित केले. आम्ही प्रभावी गोलंदाजी करू शकलो नाही. आमच्या गोलंदाजांना लयच सापडली नव्हती. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी मजबूत आहे. त्यांना येथील परिस्थितीही चांगलीच ज्ञात आहे, त्याचा त्यांनी फायदा उठवला.
राहुल आणि अय्यर बाद नसते झाले तर…
भारतीय संघाच्या फलंदाजीविषयी बोलताना विराट म्हणाला, “हे लक्ष्य खूप मोठे होते. नियमित अंतराने गडी बाद होत गेल्याने आम्ही लक्ष्याच्या जवळपास जाऊ शकलो नाही. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी अत्यंत सुरेख खेळ केला. त्यांचे क्षेत्ररक्षण विलोभनीय होते आणि त्यांच्या विजयाचे हे देखील एक कारण आहे. जर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल शेवटपर्यंत खेळले असते, तर आम्ही कदाचित सामना जिंकू शकलो असतो.”
विराटने संपवला एससीजीवरील धावांचा दुष्काळ
भारतीय संघाने दुसरा वनडे सामना गमावला असला, तरी विराट कोहलीने सिडनी क्रिकेट ग्राउंड अर्थात एससीजीवरील आपला धावांचा दुष्काळ संपवला. दुसर्या वनडे सामन्यात विराटने ८९ धावा फटकावल्या. विराटचे हे या मैदानावरील पहिले अर्धशतक होते. विराटने फलंदाजीत चांगली कामगिरी केली. वेगवान गोलंदाज जॉश हेझलवूडच्या चेंडूवर मोइसेस हेन्रीक्सने प्रेक्षणीय झेल घेऊन त्याला माघारी पाठवले. विराट परतल्यानंतर, भारतीय संघाचा पराभव जवळपास निश्चित झाला होता.
प्रतिष्ठेसाठी खेळणार भारतीय संघ
पहिल्या दोन सामन्यात पराभूत झाल्याने भारतीय संघाने ही वनडे मालिका गमावली आहे. मालिकेतील अखेरचा सामना कॅनबेरा येथे २ डिसेंबर रोजी खेळला जाईल. या सामन्यात विजय मिळवून, प्रतिष्ठा राखण्याचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया तिसरा सामना जिंकत, भारताला ‘व्हाईटवॉश’ देण्याचा प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
अफलातून ! हेन्रीक्सने विराटचा घेतला जबरदस्त झेल, पाहा व्हिडिओ
IND vs AUS : प्रेमासाठी काय पण! भावाने चालू सामन्यात तरूणीला केलं प्रपोज, पाहा तिची प्रतिक्रिया
अय्यरच्या रॉकेट थ्रो पुढे धडाकेबाज वॉर्नर गारद; Video जोरदार व्हायरल
ट्रेंडिंग लेख-
बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचे टी२० क्रिकेटमधील सर्वात मोठे तीन विजय
पाच नाही; सहा नाही, तब्बल १० देशांत कसोटी शतके करणारे जगातील २ फलंदाज
भारताने ९८८ वनडे सामने खेळले, पण ‘असा’ नकोसा विक्रम पहिल्यांदाच झाला






