---Advertisement---

‘मी खेळण्यास सज्ज होतो, परंतु व्यवस्थापनाला दुसरा खेळाडू माझ्यापेक्षा श्रेष्ठ वाटला’

On: शुक्रवार, मे 28, 2021 2:34 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याच्या क्रिकेट कारकीर्दीतील सर्वात वाईट काळ सुरू आहे. युजवेंद्र चहलसोबत मिळून भारतीय संघाला अनेक सामन्यात विजय मिळवून देणाऱ्या या गोलंदाजाकडे आता दुर्लक्ष केले जात आहे. त्याची संघात निवड होऊनही अंतिम ११ जणांमध्ये त्याला स्थान दिले गेले नाही. इतकेच नव्हे तर आयपीएल २०२१ मध्येही तो बाकावर बसून होता. अशातच त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या संघ व्यवस्थापनाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

कुलदीप यादवने नुकतीच एका वेब पोर्टलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याला विचारण्यात आले होते की, कोलकाता नाईट रायडर्स संघ व्यवस्थापकांनी तुम्हाला कठोर वागणूक दिली असे तुम्हाला वाटते का?

या प्रश्नाचे उत्तर देत असताना तो म्हणाला की, “हे सांगणे कठीण आहे. परंतु कधी-कधी असे वाटते की, आपण खेळण्यासाठी सज्ज आहोत. परंतु संघ व्यवस्थापकांना असे वाटत नाही. त्यांना नेहमी संघ संतुलित ठेवण्यासाठी असे वाटत असते की, आपल्यापेक्षा ही कोणीतरी दुसरा श्रेष्ठ खेळाडू आहे. मी आयपीएल २०२१ स्पर्धेत चेन्नईमध्ये खेळण्यास सज्ज होतो. परंतु मला संधी मिळालीच नाही. हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होते. ”

https://www.instagram.com/p/CNuR2ZpBg9m/?utm_medium=copy_link

कुलदीप यादवने २०१६ मध्ये आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत त्याला एकूण ४५ आयपीएल सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये त्याने ८.२७ च्या इकोनॉमीने ४० गडी बाद केले आहेत.

परंतु गेल्या काही महिन्यांपासून त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत आहे. त्याने अनेकदा म्हटले आहे की, एमएस धोनी यष्टीमागे नाही म्हणून त्याचा आत्मविश्वास खालावला आहे. आयपीएलपुर्वी त्याला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत संधी तर देण्यात आली होती; परंतु त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आले नव्हते. तसेच इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत त्याला संधी दिली गेली होती. परंतु त्याला गडी बाद करण्यात अपयश आले होते.

येत्या जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर मर्यादित षटकांची मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. या दौऱ्यावर कुलदीप यादवला खेळवले जाऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या-

पीएसएलच्या उर्वरित हंगामाचा मार्ग मोकळा, मुंबईहून चार्टर्ड विमान प्रवासाला युएई सरकारचा हिरवा कंदील

भारीच ना! डेविड वॉर्नरची पत्नी ऑलिम्पिक दर्शकांना आपल्या वाणीतून करणार मंत्रमुग्ध

वयाच्या ४२व्या वर्षापर्यंत फिरकीपटू अश्विन क्रिकेटविश्वावर अधिराज्य गाजवणार!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---