साउथँम्पटन। 2019 क्रिकेट विश्वचषकात आज आठवा सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात रोज बॉल स्टेडीयमवर होत आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 227 धावा केल्या आहेत.
भारताकडून या सामन्यात फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने 51 धावांत सर्वाधिक 4 विकेट घेत शानदार कामगिरी केली. याबरोबरच त्याने एक खास कारनामा केला आहे. तो विश्वचषकातील एका सामन्यात 4 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा चौथा भारतीय फिरकी गोलंदाज ठरला आहे.
याआधी युवराज सिंग, आर अश्विन आणि अनिल कुंबळे या फिरकी गोलंदाजांनी अशी कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे युवराज सिंगने विश्वचषकातील एका सामन्यात 4 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी दोन वेळा केली आहे. तर कुंबळे आणि अश्विनने प्रत्येकी एक वेळा अशी कामगिरी केली आहे.
तसेच विश्वचषकात एका सामन्यात 4 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स आत्तापर्यंत 17 भारतीय गोलंदाजांनी घेतल्या आहेत. चहल हा या यादीतील 17 वा गोलंदाज आहे.
चहलने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस, रस्सी वॅन डर दसेन, डेव्हिड मिलर आणि अँडील फेहलुक्वायो यांच्या विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे हा चहलचा वनडे विश्वचषकातील पहिलाच सामना आहे.
त्याचबरोबर तो विश्वचषकातील पदार्पणाच्या सामन्यात भारताकडून सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजही ठरला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर मोहम्मद शमी आहे. त्याने 2015 च्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध त्याचा विश्वचषकातील पहिला सामना खेळताना 35 धावा देत 4 विकेट घेतल्या होत्या.
#विश्वचषकातील एका सामन्यात सर्वाधिकवेळा 4 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारे भारतीय फिरकी गोलंदाज –
2 वेळा – युवराज सिंग (2003, 2011)
1 वेळा – आर अश्विन (2015)
1 वेळा – अनिल कुंबळे (2003)
1 वेळा – युजवेंद्र चहल (2019)
#विश्वचषकाच्या पदार्पणाच्या सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणारे भारतीय गोलंदाज-
4 विकेट/35 धावा – मोहम्मद शमी (विरुद्ध पाकिस्तान, 2015)
4 विकेट/51 धावा – युजवेंद्र चहल (विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2019)
4 विकेट/56 धावा – देबाशिष मोहंती (विरुद्ध केनिया, 1999)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषक २०१९: एमएस धोनीने यष्टीरक्षकांच्या या खास यादीत ब्रेंडन मॅक्यूलमला टाकले मागे
–विश्वचषक २०१९: रोहित शर्मा, विराट कोहलीने घेतले शानदार झेल, पहा व्हिडिओ
–विश्वचषक २०१९: इंग्लंड आणि पाकिस्तानच्या या खेळाडूंना झाला दंड, जाणून घ्या कारण
–विश्वचषकातून बाहेर पडलेल्या डेल स्टेनला विराट कोहलीने दिला भावनिक संदेश, पहा व्हिडिओ
–विश्वचषक २०१९: पहिल्या सामन्यासाठी असा आहे भारताचा ११ जणांचा संघ