इंडियन सुपर लीग अर्थात आयएसएलमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबने इंग्लंडचे माजी फुटबॉलर रॉबी फावलर यांची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली आहे. ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबचे मालक हरी मोहन बांगर यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली.
ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबचे सर्वेसर्वा असलेले बांगर हे, फावलर यांच्या नियुक्तीविषयी सांगताना म्हटले,
“फावलर यांच्यासारखा दिग्गज क्लबशी जोडला गेल्याने, आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे. फावलर हे पुढील दोन वर्ष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी असतील. फावलर यांच्या पाठीशी अफाट अनुभवाची शिदोरी आहे. फावलर दर्जेदार फुटबॉल खेळले असल्याने, त्याचा फायदा आमच्या क्लबला नक्कीच होईल.”
रॉबी फावलर हे प्रीमियर लीगमधील लिव्हरपूल संघाचे दिग्गज म्हणून ओळखले जातात. अगदी लहान वयापासून ते लिव्हरपूलशी जोडले गेले होते. १९९३ ते २००१ या काळात ते लिव्हरपूलचे प्रमुख स्ट्रायकर म्हणून खेळत. फावलर यांनी आपल्या कारकीर्दीत क्लब फुटबॉलमध्ये ४६० गोल झळकावले आहेत. यातील १६३ गोल प्रीमियर लीगमधील आहेत. प्रीमियर लीगच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये, फावलर यांचा सातवा क्रमांक लागतो. फावलर यांनी २६ सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधित्व करताना ७ गोल केले आहेत.
प्रशिक्षक म्हणून ४५ वर्षीय, फावलर यांनी यापूर्वी थायलंडमधील मुआंगथांग युनायटेड व ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन रोअर या संघांसाठी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.
भारताचे माजी कर्णधार रेनेडी सिंह हे ईस्ट बंगालचे सहाय्यक प्रशिक्षक असतील. रेनेडी सिंह यापूर्वी ईस्ट बंगालचे कर्णधार देखील राहिले आहेत. प्रथमच आयएसएलमध्ये सहभागी होणाऱ्या ईस्ट बंगालला विजेतेपद मिळवून देण्याची जबाबदारी, या दोन्ही अनुभवी प्रशिक्षकांवर असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-पंजाब संघामागची साडेसाती संपेना! ८.५ कोटींना टीममध्ये घेतलेल्या खेळाडूला झाली दुखापत
-ज्या धोनीच्या सीएसकेला नडला, त्याच धोनीशी राहुल त्रिपाठीचे आहे खास नाते
-कधीकाळी खेळपट्टी तयार करणारा गाजवतोय आयपीएल, वाचा त्याच्या संघर्षाची कहानी
ट्रेंडिंग लेख-
-जो नडला त्याला तिथेच धुतला.! सहा टाके पडूनही मैदानावर परतत खेळाडूने गोलंदाजाची केली मनसोक्त धुलाई
-शतकी खेळी करणाऱ्या भारतीय खेळाडूला ‘त्यांनी’ चक्क घेतले होते उचलून
-शेन वॉर्नच्या ‘त्या’ चेंडूला रिची बेनो यांनीच म्हटले होते शतकातील सर्वोत्तम चेंडू