---Advertisement---

माना पटेलची टोकियो ऑलिम्पिकमध्ये धडक, हा पराक्रम करणारी ठरली पहिलीच भारतीय महिला

On: शुक्रवार, जुलै 2, 2021 1:41 PM
---Advertisement---

भारतीय महिला जलतरणपटू माना पटेल हिला टोकियो ऑलिम्पिक तिकीट मिळाले आहे. भारतीय जलतरण महासंघाने (एएफआय) दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठाच्या कोट्यातून मानाची टोकियो ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. माना टोकियो गेम्समधील 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये भाग घेईल. या खेळासाठी पात्र ठरणारी ती तिसरी भारतीय जलतरणपटू आहे. तर महिलांमध्ये पहिल्यांदाच कोणी हा पराक्रम केला आहे. मानापुर्वी श्रीहरी नटराज आणि साजन प्रकाश यांनी ऑलिम्पिक पात्रता फेरीतील ए पातळीमध्ये प्रवेश मिळवला होता.

मानाने ऑलम्पिक डॉट कॉमसोबत बोलताना सांगितले की, ‘हा खूप छान अनुभव आहे. मी सहकारी जलतरणपटूंकडून ऑलिम्पिकविषयी ऐकले आहे आणि त्यांना टेलिव्हिजनवर पाहिले आहे. मी तेथील बरीच फोटोही पाहिले आहेत. परंतु यावेळी मी स्वत: जगातील सर्वोत्कृष्ट स्पर्धेत भाग घेईन आणि मी या स्पर्धेसाठी खूप उत्सुक आहे.’

2019 मध्ये घोट्याच्या दुखापतीमुळे माना काही काळ जलतरण स्पर्धांपासून दूर होती. परंतु यावर्षाच्या सुरुवातीला तिने पुनरागमन केले होते. यासंबंधी बोलताना मानाने सांगितले की, ‘कोरोना महामारीमुळे झालेल्या लॉकडाऊनने मला दुखापतीतून बरे होण्यास मदत केली आहे. परंतु त्यानंतर निराशाही झाली. मला इतके दिवस पाण्यापासून दूर राहण्याची सवय नाही.’

यंदाची तिची पहिली स्पर्धा एप्रिलमध्ये उझबेकिस्तान ओपन जलतरण स्पर्धेत होती, ज्यामध्ये तिने 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये एक मिनिट 04.47 सेकंदांनी सुवर्णपदक जिंकले होते. ती पुढे म्हणाली की, ‘उझबेकिस्तानमधील माझ्या वेळेमुळे मी आनंदी आहे. कारण मी नुकतेच पुनरागमन केले होते. त्या मानाने माझी कामगिरी चांगली होती.’

नुकताच मानाने टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी सर्बिया आणि इटलीत झालेल्या जलतरण स्पर्धेत भाग घेतला होता. तसेच बेलग्रेडमधील 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्येही तिने राष्ट्रीय विक्रम केला होता.

ती म्हणाली की, ‘बेलग्रेडमध्ये मी एक मिनिट आणि तीन सेकंदापर्यंत शर्यत पूर्ण केली होती. टोक्योमध्ये 1 मिनिट 02 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळ घेणे माझे ध्येय आहे. मला फक्त ऑलिम्पिकचा अनुभव घ्यायचा आहे. याद्वारे मला कॉमनवेल्थ आणि आशियाई खेळात पदके जिंकण्याची चांगली संधी असेल.’

महत्त्वाच्या बातम्या-

आनंदाची बातमी! बीसीसीआयच्या ‘या’ महत्त्वपुर्ण विनंतीला ईसीबीचा होकार, विराटसेनेचं काम झालं सोपं

पहिल्याच चेंडूवर विकेट मिळल्याने गेल अतिआनंदी, कार्टविल करत केलं भन्नाट सेलिब्रेशन

विराटसेनेची चिंता शिगेला; शुबमनच्या दुखापतीविषयी मोठी माहिती आली पुढे, मालिकेला मुकण्याची शक्यता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---