नविन वर्षात टीम इंडिया किती सामने खेळणार, याचे संपुर्ण वेळापत्रक घोषीत झाले आहे. क्रिकेटप्रेमी याची गेले काही महिने आतुरतेने वाट पाहात होती. 2023 वर्ष भारतीय संघासाठी कभी खुशी कभी असेच राहिले. संघाने क्रिकेटच्या तीनही प्रकारात उत्तम कामगिरी केली परंतू भारताला 2023मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा व वनडे विश्वचषकात फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. परंतू यावर्षी पुन्हा एकदा भारतीय संघाला मोठी संधी मिळणार आहे.
2024मध्ये असे असेल टीम इंडियाचे वेळापत्रक –
2024मध्ये ३ जानेवारीपासून भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन हात करेल. त्यानंतर अफगाणिस्तान संघ भारत दौऱ्यावर येईल. 11 जानेवारी ते 17 जानेवारी 2024 दरम्यान ते भारतीय संघासोबत तीन टी20 सामने खेळतील. अफगाणिस्तान संघ हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये एक तगडा संघ समजला जातो. त्यांना हलक्यात घेणे टीम इंडियाला महागात पडू शकते. 11 जानेवारी रोजी मोहाली, 14 जानेवारी रोजी इंदोर तर 17 जानेवारी रोजी बेंगालुरु इथे हे तीन सामने होतील. (Afghanistan tour of India 2024)
इंग्लंड संघाचा भारत दौरा –
त्यानंतर इंग्लंड संघ भारतीय दौऱ्यावर येणार आहे. यावेळी ते ‘इंडियन समर’मध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका भारतात खेळणार आहेत. 25 ते 29 जानेवारी दरम्यान हैद्राबाद, 02 ते 06 फेब्रुवारी दरम्यान विशाखापट्टनम, 15 ते 19 फेब्रवारी दरम्यान राजकोट, 23 ते 27 फेब्रुवारी दरम्यान रांची आणि 07 ते 11 मार्च दरम्यान धरमशाला इथे ते कसोटी सामने खेळतील. (England tour of India 2024).
टी20 वर्ल्डकपमध्ये सहभाग –
यानंतर भारतात आयपीएलच्या 17व्या हंगामाला सुरुवात होईल, त्यानंतर जून महिन्यात टी20 विश्वचषकाला सुरुवात होईल. यावर्षी प्रथमच वेस्ट इंडिज व अमेरिका क्रिकेट बोर्ड एकत्र विश्वचषकाचे आयोजन करत आहे. 4 ते 30 जून 2024 दरम्यान हा विश्वचषक होत असून यात टीम इंडियाला कमीत कमी 4 सामने खेळण्याची नक्की संधी मिळणार आहे. (IPL 2024 Schedule)
टीम इंडियाचा लंका दौरा –
जुलै महिन्यात मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी टीम इंडिया शेजारच्या श्रीलंका देशात जाईल. इथे टीम इंडिया 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळेल. ऑगस्ट महिन्यात टीम इंडियाला बऱ्यापैकी विश्रांतीची संधी मिळणार असून सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यात भारतीय संघ बांगलादेश संघाविरुद्ध मायदेशात 2 कसोटी आणि 3 टी20 सामने खेळणार आहे. (India tour of Sri Lanka 2024) (Bangladesh Tour of India 2024)
बॉर्डर-गावसकर मालिकेसाठी सज्ज –
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. यावेळी 3 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. त्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियात प्रतिष्ठेच्या बॉर्डर गावसकर मालिकेसाठी सज्ज होईल. सध्या या मालिकेचे विजेतेपद भारताकडे आहे. या मालिकेत एकूण 5 कसोटी सामने होणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी यावेळी टीम इंडियाला मिळणार आहे. (Border Gavaskar Trophy 2024)
महत्वाच्या बातम्या –
IND vs SA । ‘राम रिया राम’ गाण्यावर विराटने जोडले हात, केपटाऊन कसोटीतील व्हिडिओ तुफान व्हायरल
अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत दसॉल्ट सिस्टीम, सायबेज संघांचे विजय