भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामीवीरांनी झळकावलेल्या वेगवान शतकांच्या जोरावर भारताने निर्धारित 50 षटकात 9 बाद 385 धावा धावफलकावर लावल्या. त्याचवेळी भारतीय फलंदाजांनी या संपूर्ण डावात मोठे षटकार मारले. त्यासह भारतीय संघाच्या नावे वनडे क्रिकेटमधील एक नवा विक्रमही जमा झाला.
इंदोर येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रोहितने मागील तीन वर्षांपासून असलेला वनडे शतकांचा दुष्काळ संपवला. तर, गिलने सध्या सुरू असलेला आपला लाजवाब फॉर्म कायम राखत मागील चार सामन्यातील तिसरे शतक पूर्ण केले. त्यानंतर हार्दिक पंड्याने ठोकलेल्या अर्धशतकामूळे भारतीय संघ 385 पर्यंत मजल मारू शकला. भारतीय संघाची ही प्रथम फलंदाजी करताना मागील पाच सामन्यातील पाचवी 340 पेक्षा जास्त धावांची धावसंख्या आहे.
या सामन्यात भारतीय संघासाठी कर्णधार रोहित शर्मा याने सर्वाधिक सहा षटकार मारले. तर, गिलने 5 षटकार लगावले. उपकर्णधार हार्दिकने आपल्या अर्धशतकी खेळी दरम्यान तीन षटकार ठोकले. तर, सूर्यकुमार यादव याच्या बॅटमधून दोन उत्तुंग षटकार आले. याव्यतिरिक्त विराट कोहली, ईशान किशन व शार्दुल ठाकूर यांनी देखील प्रत्येकी एक षटकार आपल्या नावे केला.
भारतीय खेळाडूंनी या सामन्यात एकूण 19 षटकारांची आतिषबाजी केली. भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात संयुक्तरिक्त लगावलेले हे सर्वाधिक षटकार आहेत. भारताने यापूर्वी 2013 मध्ये बेंगलोर येथील वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धही 19 षटकार लगावले होते. यात सामन्यात रोहित शर्माने आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले द्विशतक पूर्ण केलेले.
(Indian Team Equal Record Of Most Sixes In ODI Inning Against Newzealand In Indore ODI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लय भारी! शतकांची तिशी ओलांडणारा रोहित ठरला तिसरा भारतीय
यत्र तत्र सर्वत्र शुबमन गिल! 2022 पासूनचे आकडे पाहून नक्कीच वाटेल अभिमान