येत्या ऑगस्ट महिन्यात भारत आणि इंग्लंड या बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. या मालिकेपूर्वी अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी आपले मत मांडले आहे. या मोठ्या मालिकेत कुठला संघ बाजी मारेल याबाबत माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू इयान चॅपेल यांनी देखील भाष्य केले आहे.
ऑस्ट्रेलियन संघाचे माजी क्रिकेटपटू इयान चॅपल यांनी म्हटले की, “जरी भारतीय संघाने न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना गमावला असला, तरीही भारतीय संघातील वेगवान गोलंदाजांनी गेल्या काही वर्षात उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. जी गेल्या काही वर्षांपूर्वीची ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज संघासारखी भासून येत आहे.” (Indian team has equal chance to beat England in test series)
इयान चॅपल यांनी इएसपीएन क्रिकइन्फोच्या स्थंभात लिहिले की, “गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाचा समावेश उत्कृष्ट वेगवान गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या यादीत झाला आहे. त्यामुळेच त्यांना ऑस्ट्रेलियामध्ये विजयाचा स्वाद चाखण्याची संधी मिळाली आणि विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळाला. आता भारतीय संघाकडे इंग्लंडला इंग्लंडमध्ये पराभूत करण्याची बरोबरीची संधी आहे. संघात चांगले वेगवान गोलंदाज असण्याचे खूप फायदे आहेत.”
इयान चॅपल यांच्या मते, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा,जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. ते पुढे म्हणाले की, “न्यूझीलंड संघाला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्यात विजय मिळवून देण्यात, टीम साउदी, ट्रेंट बोल्ट, निल वॅगनर आणि काईल जेमिसन यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.” त्यांनी न्यूझीलंड संघातील या ४ गोलंदाजांची तुलना, १९७० ते १९९० च्या वेस्ट इंडिज संघातील गोलंदाजांशी केली आहे.
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
महत्वाच्या बातम्या-
आऊटस्विंगर की इनस्विंगर? इंग्लिश गोलंदाजाच्या चतुर गोलंदाजीने गोंधळला फलंदाज, ‘अशी’ गमावली विकेट
द्रविडने नकार दिल्यास ‘हे’ ३ दिग्गज घेऊ शकतात टीम इंडियाचे महागुरु शास्त्रींची जागा