टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेला १७ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेपूर्वी सर्वच संघ कसून सराव करताना दिसून येत आहेत. तत्पूर्वी बीसीसीआयने आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची नवीन जर्सी लॉन्च केली आहे. ही जर्सी पाहून चाहते आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. तर बुर्ज खलिफावर देखील भारतीय खेळाडूंचे फोटो झळकले आहेत, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने नवीन जर्सी लॉन्च करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. हा कार्यक्रम १३ ऑक्टोबर रोजी पार पडला. भारतीय संघ आगामी टी -२o विश्वचषक स्पर्धेत नव्या जर्सीत मैदानावर उतरणार आहे. ही जर्सी पूर्वीच्या जर्सीपेक्षा थोडी वेगळी आहे. या नव्या जर्सीचा रंग आधीच्या जर्सीसारखाच आहे. परंतु त्यावरील डिजाइन वेगळी आहे. या जर्सीवर हलक्या निळ्या रंगाच्या पट्ट्या आहेत. तसेच एका बाजूला बीसीसीआयचा लोगो देखील आहे.
बुर्ज खलिफावर झळकली भारतीय संघाची जर्सी
बुधवारी (१३ ऑक्टोबर) कोट्यवधी भारतीयांची मान उंचावणारी घटना घडली. जगातील सर्वात उंच इमारतीवर भारतीय संघातील खेळाडूंचे भारतीय संघाची नवीन जर्सी परिधान केलेले फोटो झळकले आहेत. ८३० मीटर उंचीच्या या इमारतीवर भारतीय खेळाडूंचे फोटो पाहून चाहते देखील भलतेच खुश झाले आहेत. हा व्हिडीओ एमपीएल स्पोर्ट्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर कॅप्शन देत लिहिले की, “पहिल्यांदाच भारतीय क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाची जर्सी जगातील सर्वात उंच इमारतीवर झळकली.”
ही जर्सी लॉन्च केल्यानंतर, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले होते की, “भारतीय क्रिकेट संघाचे फक्त भारतातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. त्यांचा उत्साह आणि ऊर्जा दाखवण्याचा यापेक्षा उत्तम मार्ग असूच शकला नसता. भारतीय खेळाडूंची नवीकोरी जर्सी बुर्ज खलिफावर दाखवत चाहत्यांनी एकप्रकारे भारतीय संघाप्रती असलेले त्यांचे निस्सीम प्रेमच दाखवले आहे. यात काही शंका नाही की, यामुळे भारतीय संघाला जेतेपद मिळवण्याच्या मार्गावर आणखी समर्थन मिळेल.”
The Team India World Cup jersey unveil gets bigger and better with a projection on the iconic Burj Khalifa.
Watch the historic moment here! ???????? @mpl_sport #BillionCheersJersey #ShowYourGame #TeamIndia pic.twitter.com/Ee8S6rGD6c
— BCCI (@BCCI) October 14, 2021
https://www.instagram.com/tv/CU-g5XjoBm_/?utm_medium=copy_link
आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव,रिषभ पंत (यष्टिरक्षक), ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, दीपक चाहर, अक्षर पटेल
महत्त्वाच्या बातम्या-
हे फक्त रिषभच करू शकतो! लाईव्ह सामन्यात पंतने चक्क अंपायरसोबत खेळला लपंडाव, तुम्हीही पाहा






