---Advertisement---

IND vs NZ: मोहम्मद शमीला मिळणार विश्रांती, या डावखुऱ्या गोलंदाजाची होणार एँट्री?

On: शनिवार, मार्च 1, 2025 3:03 PM
---Advertisement---

यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये उद्या म्हणजेच रविवारी (2 मार्च) रोजी भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) आमने-सामने असणार आहेत. दरम्यान दोन्ही संघात दुबईच्या मैदानावर अटीतटीची लढत पाहायला मिळेल. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता खेळला जाईल.

परंतु, न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami) विश्रांती दिली जाऊ शकते. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीच्या पायाच्या स्नायूत थोडीशी समस्या होती. या कारणामुळे न्यूझीलंविरूद्धच्या सामन्यात त्याला विश्रांती दिली जाऊ शकते.

अशा परिस्थितीत न्यूझीलंड संघात 5 आक्रमक फलंदाज असल्याने डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) शमीची जागा घेऊ शकतो. अर्शदीपने गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल (Morne Morkel) यांच्यासोबत खूप सराव केला आणि 13 षटके गोलंदाजी केली. शमीने शॉर्ट रन-अप घेत  फक्त 6-7 षटके टाकली.

(23 फेब्रुवारी) रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात, तिसऱ्या षटकानंतर शमीला उजव्या पायावर फिजिओकडून उपचार घ्यावे लागले. सराव सत्रादरम्यान खेळाडूंच्या हावभावांवरून असे दिसून आले की भारत सेमीफायनलपूर्वी शमीला विश्रांती देऊ शकतो.

केएल राहुलने (KL Rahul) माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, विजयी संघात बदल होईल की नाही? हे सांगता येत नाही, परंतु सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेट यांनी गोलंदाजीच्या संघात बदल होऊ शकतो असे संकेत दिले.

भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेट म्हणाले की, स्टार यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतला चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने बाहेरून पाहणे कठीण झाले आहे, परंतु या स्तरावर खेळाचे स्वरूप असे आहे. गेल्या 2 गट सामन्यांमध्ये पंत प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे, तर केएल राहुलने विकेटकीपिंग केली आहे. मधल्या फळीत चांगली फलंदाजी करण्यासोबतच, त्याने यष्टीमागेही आपले काम चांगले केले.

रायन टेन डोइशेट म्हणाले, “केएलची कामगिरी चांगली झाली आहे. आम्हाला रिषभला तयार ठेवावे लागले म्हणून त्याला जास्त संधी मिळाल्या नाहीत. आम्हाला त्याची कधी गरज पडेल हे माहित नाही, पण संघात 2 उत्कृष्ट यष्टीरक्षक असणे चांगले आहे.”

यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रिषभ पंत, रवींद्र जडेजा

महत्त्वाच्या बातम्या-

जोस बटलरची जागा कोण घेणार? इंग्लंडच्या कर्णधारपदासाठी 3 प्रमुख दावेदार!
रोहित शर्माच्या न्यूझीलंडविरुद्ध 3 धमाकेदार खेळी! पुन्हा एकदा गाजवणार मैदान?
‘भारतीय क्रिकेटमुळेच तुमचा पगार…’, गावस्करांनी माजी इंग्लिश कर्णधाराला झापलं!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---