---Advertisement---

रोहित शर्माच्या न्यूझीलंडविरुद्ध 3 धमाकेदार खेळी! पुन्हा एकदा गाजवणार मैदान?

On: शनिवार, मार्च 1, 2025 2:36 PM
---Advertisement---

सध्याची आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. तत्पूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेवटच्या साखळी सामन्यात चांगली खेळी खेळण्याचा प्रयत्न करेल. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यापूर्वी रोहितने दोन्ही सामन्यांमध्ये चांगली सुरुवात केली होती. बांगलादेशविरुद्ध 41 आणि पाकिस्तानविरुद्ध 20 धावा करणारा रोहित सेमीफायनलपूर्वी मोठी खेळी करून आपला आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करेन.

रोहितचा न्यूझीलंडविरुद्धचा रेकॉर्डही खूप चांगला आहे. त्याने या संघाविरुद्ध अनेक उत्कृष्ट खेळी खेळल्या आहेत आणि भारताला विजय मिळवून दिला आहे. या मालिकेत, रोहितने न्यूझीलंडविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये खेळलेल्या 3 सर्वोत्तम खेळींबद्दल आपण जाणून घेऊया.

1) 147 कानपूर 2017- न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात रोहितची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. तो सुमारे 107च्या स्ट्राईक रेटने खेळला आणि फक्त 138 चेंडूत 147 धावा केल्या. रोहित सुरुवातीपासूनच चांगल्या लयीत दिसत होता आणि त्याने त्याच्या डावात
18 चौकारांसह 2 षटकार मारले.

2) 101 इंदूर 2023- प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित झाल्यानंतर, भारताने धमाकेदार सुरुवात केली आणि केवळ 26.1 षटकांत 1 गडी गमावून 212 धावा केल्या. रोहितने फक्त 85 चेंडूत 101 धावा केल्या ज्यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 120च्या जवळ होता. रोहितने त्याच्या खेळीत 6 षटकारांसह 9 चौकार लगावले. या सामन्यात भारताने 385 धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर न्यूझीलंडला फक्त 295 धावांत गुंडाळून सामना जिंकला.

3) 87 माउंट मौंगानुई 2019- रोहितने वनडे क्रिकेटमध्ये विदेशी मैदानावर खेळलेल्या सर्वोत्तम खेळींपैकी ही एक आहे. प्रथम फलंदाजी करताना रोहितने शिखर धवनसह भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 154 धावांची भागीदारी रचली. रोहितने 96 चेंडूत 87 धावा केल्या आणि तो खूप चांगल्या लयीत दिसत होता. दरम्यान त्याने आपल्या खेळीत 9 चौकारांस 3 षटकार ठोकले.

आता भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) संघ उद्या (2 मार्च) रोजी आमने-सामने असणार आहेत. सेमीफायनलपूर्वी दोन्ही संघांनी चमकदार कामगिरी केली आहे. दरम्यान आता कोण बाजी मारेल हे पाहणेदेखील मनोरंजक ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या-

‘भारतीय क्रिकेटमुळेच तुमचा पगार…’, गावस्करांनी माजी इंग्लिश कर्णधाराला झापलं!
चॅम्पियन्स ट्राॅफी दरम्यान संघाला मोठा धक्का…! स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
Champions Trophy 2025: रोहित शर्माचा पत्ता कट? शुबमन गील टीम इंडियाचा कर्णधार!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---