पहिल्यावहिल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाने कसून सरावाला सुरवात केली आहे. भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध साऊथॅम्पनमध्ये हा अंतिम सामना खेळेल. न्यूझीलंड संघ काही दिवसांपूर्वीच इंग्लंडमध्ये दाखल झाला असून तो इंग्लंडविरुद्ध 2 कसोटी सामन्याची मालिका खेळत आहे, तर भारतीय संघाला या अंतिम सामन्याआधी सराव सामना खेळण्याची संधी नाही. त्यामुळे अनेक क्रिकेट जाणकार न्यूझीलंड संघाला पसंती देत आहेत.
भारतीय संघाचा माजी वेगवाग गोलंदाज अजित आगरकरने या सामन्यासाठी भारतीय संघाला न्यूझीलंडच्या गोलंदाजांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
आगरकरने सांगितले की, न्यूझीलंडकडे वेगवान गोलंदाजीत चांगली विविधता आहे. त्यांच्याजवळ कायल जेमिसन, ट्रेंट बोल्ट, टीम साउथी आणि निल वॅग्नर सारखे गुणवान वेगवान गोलंदाज आहे. त्यासोबतच इंग्लंडमधील परिस्थिती देखील न्यूझीलंड सारखीच आहे, जिथे चेंडू नेहमी सीम किंवा स्विंग होतो.
43 वर्षीय माजी गोलंदाज स्टार स्पोर्ट्सच्या ‘गेम प्लान’ मध्ये चर्चा करीत होता. त्याने सांगितले की, ‘न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाकडे भरपूर विविधता आहे, त्यांच्याकडे जमिन्सन आहे जो उंचापुरा असून आपल्या शैलीने फलंदाजासमोर प्रश्न उभे करू शकतो. बोल्ट आणि साउथी दोघेही चेंडू दोन्ही बाजूला स्विंग करायची क्षमता बाळगून आहेत.
हा 43 वर्षीय माजी गोलंदाज स्टार स्पोर्ट्सच्या ‘ गेम प्लान’ मध्ये चर्चा करीत होता. त्याने सांगितले की, ‘न्युझीलंडच्या वेगवान गोलंदाजी आक्रमनाकडे भरपूर विविधता आहे, त्यांच्याकडे जेमिसन आहे, जो उंचापुरा असून आपल्या शैलीने फलंदाजासमोर प्रश्न उभे करू शकतो. बोल्ट आणि साउथी दोघेही चेंडू दोन्ही बाजूला स्विंग करायची क्षमता बाळगून आहेत. आणि जर हे तिघे काही करु शकले नाही तर त्यांच्याजवळ वॅग्नर आहे. वॅग्नर सपाट खेळपट्टीवर देखील त्याची चेंडू हरकत करतात, तर इथे परिस्थिती त्याला पोषक असेल तसेच हा सामना ड्युक चेंडूने खेळला जाणार असून तो सगळ्यात जास्त स्विंग होतो.’
भारतीय संघासाठी 26 कसोटी, 191 एकदिवसीय आणि 4 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या आगरकरने सांगितले की, भारतासाठी हा सामना अवघड आहे. कारण भारतीय संघ सध्याच्या घडीला कोणतीच कसोटी मालिका खेळलेला नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर परदेशात एकही कसोटी सामना खेळलेला नाही, त्यामुळे ही एक मोठी समस्या असून सामन्याआधीची तयारी महत्वाची ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अजिंक्य रहाणेला १२ वर्षांपूर्वी ‘द वॉल’ राहुल द्रविडने दिला होता ‘हा’ लाखमोलाचा सल्ला
इरफान पठाणचा वेगवान गोलंदाजांना सल्ला, ‘तुम्ही भुवनेश्वरवरून अख्तर बनू शकत नाही, त्या नादात तुम्ही…’
ताबडतोड फलंदाजी! आपल्या अद्भुत फटकेबाजीने लोकांचे मनोरंजन करणारे ३ फलंदाज