भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाची चार सामन्यांची कसोटी मालिका आता अतिशय रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता, तर दुसऱ्या सामन्यात भारताने पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती. यांनतर सिडनीत झालेला तिसरा सामना अनिर्णीत राहिला. त्यामुळे १-१ अशी बरोबरी असलेल्या या मालिकेचा निकाल चौथ्या सामन्यावर अवलंबून आहे.
चौथ्या सामन्याला उद्या (१५ जानेवारी) पासून ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर सुरुवात होत आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघ कसून सराव करत असल्याचे दिसून आले. बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवर भारतीय संघाच्या सरावाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओत कर्णधार अजिंक्य रहाणेसह शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, पृथ्वी शॉ हे आपली फलंदाजी तंत्र घोटून पक्के करत असल्याचे दिसत आहेत. त्याचप्रमाणे या कसोटीत संधी मिळण्याची शक्यता असलेले शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव देखील फलंदाजीत हात आजमावून पाहताना आढळून येत आहेत. तसेच युवा कार्तिक त्यागी आणि वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजीचा सराव करत असल्याचे या व्हिडिओत दिसून येते.
???????? In all readiness for the Gabba Test ????????#TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/x86s0o70dJ
— BCCI (@BCCI) January 13, 2021
दरम्यान, ब्रिस्बेन कसोटीसाठी दुखापतींवर मात करायचे आव्हान भारतापुढे आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे या सामन्याला मुकणार आहे तर हनुमा विहारी आणि जसप्रीत बुमराह यांच्या खेळण्याबाबतही साशंकता आहे. त्यामुळे भारतीय संघ या अडचणींवर मत करून ब्रिस्बेन कसोटीत कशी कामगिरी करतो, याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.
महत्वाच्या बातम्या:
म्हणून चौथ्या कसोटीसाठीच्या भारतीय प्लेईंग इलेव्हनची घोषणा उद्याच होणार!
स्टीव स्मिथ प्रकरणावरून माजी दिग्गजांमध्ये जुंपली; पाहा काय आहे प्रकरण
गावसकर यांच्या मताने आम्हाला तसूभरही फरक पडत नाही, ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनचे विधान






