भारत विरुद्ध इंग्लंडच्या मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना आज अहमदाबादच्या ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’वर निकाली ठरला. भारतीय संघाने या सामन्यात पाहुण्या इंग्लंडवर एक डाव आणि २५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. यासह चार कसोटी सामन्यांची मालिका ३-१ अशी खिशात घातली. तसेच या विजयामुळे भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतही धडक मारली.
मात्र खुशखबरींचा हा सिलसिला भारतीय संघासाठी इथेच थांबला नाही. भारतासाठी यानंतर अजून एक आनंदाची आणि अभिमानाची बातमी पुढे आली आहे. आयसीसीच्या जागतिक कसोटी क्रमवारीत भारताने न्यूझीलंडला पछाडत अव्वल स्थान गाठले आहे. त्यामुळे विराट कोहली आणि कंपनीचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
भारताचा क्रमवारीत डंका
भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या विजयाने बोनस मिळाला आहे. आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटीच्या जागतिक सांघिक क्रमवारीत भारताने अव्वल स्थानी धडक मारली आहे. याआधी भारत दुसऱ्या स्थानावर होता. मात्र इंग्लंडविरुद्ध चौथ्या सामन्यात मिळालेल्या विजयाने भारताच्या रेटिंग गुणांमध्ये सुधारणा झाली. आणि १२२ रेटिंग गुणांसह आता भारत अव्वलस्थानी विराजमान झाला आहे.
मात्र यामुळे न्यूझीलंडचा संघ आता दुसऱ्या स्थानावर आला आहे. त्यांचे ११८ रेटिंग गुण आहे. मात्र याव्यतिरिक्त उर्वरित यादीत बदल झालेला नाही. ऑस्ट्रेलियन संघ तिसऱ्या तर इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानावर आहे. त्यानंतर पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहे. तर वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश तळाच्या तीन स्थानांवर आहेत.
https://twitter.com/ICC/status/1368149627464118274
दरम्यान, आज संपलेल्या सामन्यात भारताने सांघिक कामगिरीचे दर्शन घडवत इंग्लंडला चारीमुंड्या चीत केले. पहिल्या डावातील इंग्लंडच्या २०५ या धावसंख्येला प्रत्युतर देताना भारताने रिषभ पंत आणि वाॅशिंग्टन सुंदरच्या शानदार खेळींच्या जोरावर ३६५ धावा उभारल्या. पहिल्या डावात १६० धावांची आघाडी घेतलेल्या भारताने दुसऱ्या डावातही इंग्लंडला १३५ धावांवर गुंडाळले. आणि एक डाव आणि २५ धावांनी इंग्लिश संघाला धूळ चारली.
महत्वाच्या बातम्या:
भारत कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र ठरताच विराटचा कपिल, गांगुली धोनीच्या पंक्तीत समावेश
भावा हे काय केलंस! विराटचा थ्रो लागला रूटच्या नाजुक भागी, मजेदार व्हिडिओ होतोय व्हायरल
Video : गावसकरांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची पन्नाशी, बीसीसीआयने असा केला सन्मान