भारतीय संघ टी20 विश्वचषक जिंकून मायदेशी परतला आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया चक्री वादळामुळे बार्बाडोसमध्ये अडकली होती. बीसीसीआयने पाठवलेल्या विशेष विमानातून रोहित आणि कंपनी आज (4 जुलै) सकाळी 6 वाजताच्या दरम्यान दिल्लीमध्ये पोहचली. एवढ्या सकाळी सुद्ध भारतीय संघाच्या स्वागतासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यमध्ये दिसत आहे की जेव्हा 2023 चा विश्वचषक जिंकून ऑस्ट्रेलिया संघ त्यांच्या मायदेशी परतला होता. तेव्हा त्यांचा विमानतळावर स्वागत करण्यात आले नाही.
ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली 2023 एकदिवसीय विश्वचषक जिंकला. कांगारु संघाने अंतिम फेरीत भारताचा पराभव करून ट्रॉफी जिंकली. वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर ऑस्ट्रेलिया जेव्हा तिच्या देशात पोहोचला तेव्हा तिच्या स्वागतासाठी कोणीही आले नाही.
Pat Cummins back on home soil as a World Cup winning captain #CWC23 pic.twitter.com/0r7MhPmwXZ
— Andrew McGlashan (@andymcg_cricket) November 21, 2023
The craze in New Delhi outside the airport for team India. 🥶🇮🇳 pic.twitter.com/e0RfBWRre2
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 4, 2024
भारतीय संघाने 17 वर्षानंतर पुन्हा एकदा टी20 विश्वचषक जिंकला आहे. टीम इंडिया 2007 मध्ये एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली टी20 विश्वचषकाच्या पहिल्या आवृत्तीतच ट्राॅफी जिंकली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ यंदाची टी20 ट्राॅफी उचलला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर टीम मुंबई मध्ये खुल्या बसमधून विजयी परेड करणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये जगाचा फरक आहे… टीम इंडियासाठी विमानतळावर जमली गर्दी, कांगारू संघाचं स्वागत झालं नाही. क्रिकेटची पूजा करणारे राष्ट्र, क्रिकेट खेळणारे राष्ट्र
महत्तवाच्या बातम्या-
अभिमानाचा क्षण! मुख्यमंत्र्यांचं खास आमंत्रण, रोहित शर्मासह या खेळाडूंना विधानसभेत भेटीसाठी बोलावलं
भारतीय संघाने घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास व्हिडिओ आला समोर
टीम इंडियानं बार्बाडोसहून ज्या विमानानं प्रवास केला, त्यानं बनवला मोठा विक्रम! जाणून घ्या