भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे (T 20 series IND vs SA). या मालिकेतील तिसरा टी-20 सामना धर्मशाला येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने उत्कृष्ट प्रदर्शन करत शानदार विजय मिळवला. भारतीय संघाने प्रथम गोलंदाजीत वर्चस्व गाजवले, त्यानंतर दमदार फलंदाजी करून सामना आपल्या नावावर केला. या विजयासह, 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाने 2-1 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. 117 धावांत आफ्रिकेचा डाव संपला
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकांत केवळ 117 धावांवर ऑल आऊट झाला. आफ्रिकेकडून सलामीवीर क्विंटन डीकॉकने 3 चेंडूंमध्ये 1 धाव केली, तर रीझा हेंड्रिक्सला खातेही उघडता आले नाही. एडेन मार्करमने 46 चेंडूंमध्ये 61 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि आफ्रिकेसाठी सर्वाधिक धावा केल्या. याशिवाय, डोनोवन फेरेरा 15 चेंडूंमध्ये 20 धावा काढून बाद झाला.
भारताकडून अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर, शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांना प्रत्येकी 1-2 विकेट्स घेतली.
118 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने हा सामना सहज जिंकला. सलामीवीर अभिषेक शर्माने संघाला अत्यंत वेगवान सुरुवात दिली.
त्याने केवळ 18 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि ३ षटकारांसह 35 धावांची धडाकेबाज खेळी केली. शुभमन गिलने 23 चेंडूंमध्ये 28 धावा केल्या, तर सूर्यकुमार यादवने 11 चेंडूंमध्ये 12 धावांचे योगदान दिले.






