दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धचा शेवटचा सामना पावसामुळे रद्द केला गेला. उभय संघातील टी-२० मालिका २-२ अशा बरोबरीवर राहिली. मालिका संपल्यानंतर प्रशिक्षर राहुल द्रविड संघातील काही महत्वाच्या खेळाडूंसोबत इंग्लंडला रवाना झाले. तर इतर खेळाडूंचा संघ काही दिवसांमध्ये आयर्लंड दौऱ्यावर जाईल. एकंदरीत पाहिले, तर भारतीय संघ यावर्षी खूपच व्यस्त आहे.
एकाच वेळी आयर्लंड आणि इंग्लंड दौरा
आयर्लंडविरुद्ध भारताला दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. त्यातील पहिला सामना २६ जून आणि दुसरा सामना २८ जून रोजी खेळला जाईल. आयर्लंडविरुद्धचे सामने संपल्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर भारताचा वरिष्ठ संघ १ जुलैपासून कसोटी सामना खेळणार आहे. मागच्या वर्षी कसोटी मालिकेतील शेवटचा सामना कोरोनाच्या कारणास्तव स्थगित केला गेला होता, जो यावर्षी खेळला जात आहे. या कसोटी सामन्यानंतर इंग्लंड आणि भारत यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळली जाईल. भारताचा इंग्लंड दौरा १७ जुलैला संपणार आहे.
वेस्ट इंडीज दौरा
इंग्लंड दौरा संपल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजला जाणार आहे. वेस्ट इंडीजमध्ये २२ जुलैपासून त्यांना पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. ही मालिका ७ ऑगस्टमध्ये संपेल. मालिकेतील दोन सामने अमेरिकेच्या प्लॉरिडामध्ये खेळले जातील.
आशिया कप
भारतीय संघ वेस्ट इंडीजविरुद्धची टी-२० मालिका खेळल्यानंतर आशिया कप खेळण्यासाठी श्रीलंकेला जाणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप आलेले नाही. परंतु अशी माहिती आहे की, २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरदरम्यान ही स्पर्धा खेळली जाणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात टी-२० मालिका
भारतीय संघाला सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध टी-२० मालिकेत यजमानपद भूषवायचे आहे. ही टी-२० मालिका तीन सामन्यांची असेल.
टी-२० विश्वचषक
ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात भारतीय संघ विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल. विश्वचषकाची सुरुवात १६ ऑक्टोबरला होणार असून अंतिम सामना १३ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.
बांगलादेश आणि नंतर श्रीलंका दौरा
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भारताला दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी शेजारीराष्ट्र बांगलादेशला जायचे आहे. या मालिका संपल्यानंतर संघाला श्रीलंका दौऱ्याचाही प्रस्ताव आहे, ज्यामध्ये पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
INDvsSA T20: पावसामुळे रद्द झालेल्या सामन्याच्या तिकिटाची रक्कम मिळणार परत, जाणून घ्या किती ते
बंगाल रणजी संघ सोडल्यानंतर वृद्धिमान साहा धरणार ‘या’ नवीन संघाचा हात, वाचा सविस्तर
बंगाल रणजी संघ सोडल्यानंतर वृद्धिमान साहा धरणार ‘या’ नवीन संघाचा हात, वाचा सविस्तर






