न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर, बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेणे अनिवार्य केले होते. बीसीसीआयने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत आणि शुबमन गिल यांसारख्या खेळाडूंनी 23 जानेवारीपासून सुरू झालेल्या रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीत भाग घेतला. परंतु येथेही वरिष्ठ संघाच्या फलंदाजांची कामगिरी निराशाजनक होती. 2015 नंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच रणजी सामना खेळण्यासाठी आला आहे.
मुंबईचा सामना सध्या जम्मू आणि काश्मीर विरुद्ध सुरू आहे. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांच्या जोडीने निराशा केली. जयस्वाल 8 चेंडूत 4 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर एलबीडब्ल्यू झाला, तर रोहित शर्माने 19 चेंडूत 3 धावा केल्या.
दुसरीकडे पंजाब कर्नाटकविरुद्ध खेळत आहे. या सामन्यात गिल पंजाबचे नेतृत्व करत आहे. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला गिल 8 चेंडूत 1 चौकारासह 4 धावा काढून बाद झाला. आता सर्वांच्या नजरा दिल्लीकडून खेळणाऱ्या रिषभ पंतवर आहेत. दिल्लीचा सौराष्ट्र विरुद्धचा सामना सुरू आहे.
Indian Test top 3 in Ranji Trophy:
Rohit – 3 (19).
Jaiswal – 4 (8).
Gill – 4 (8). pic.twitter.com/w9YqTFVZIS— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 23, 2025
विराट कोहली आणि केएल राहुल सध्या देशांतर्गत सामन्यात खेळणार नाहीयेत. कोहलीला मानदुखीचा त्रास आहे तर राहुलला कोपरात काही त्रास आहे. परंतु हे दोन्ही खेळाडू 30 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पुढील सामन्यासाठी उपलब्ध असतील अशी अपेक्षा आहे.
भारताला 6 फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे. त्यामुळे 30 जानेवारीपासून सुरू होणारा रणजी सामना हा त्याच्यासाठी खेळण्याची शेवटची संधी असेल. 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होत आहे.
हेही वाचा-
232 च्या स्ट्राईक रेटने 79 धावा केल्या, तरीही अभिषेक शर्मा नव्हे तर हा खेळाडू ठरला सामनावीर
IND vs ENG: पहिल्या टी20 मध्ये शमीला संधी का मिळाली नाही? पुन्हा फिटनेसवर प्रश्नचिन्ह
अभिषेक शर्माच्या वादळाने इंग्लिश खेळाडू हैराण, विजयानंतर भारतीय सलामीवीर काय म्हणाला…