---Advertisement---

बांगलादेशला हलक्यात नाही घेणार भारतीय संघ! प्रशिक्षक राहुल द्रविडची मोठी प्रतिक्रिया

On: मंगळवार, नोव्हेंबर 1, 2022 9:56 PM
---Advertisement---

भारतीय संघाला टी-20 विश्वचषकात बुधवारी (2 नोव्हेंबर) बांगलादेशविरुद्ध खेळायचे आहेत. उभय संघांतील हा सामना एडिलेडमध्ये खेळला जाणार असून दोन्ही संघ विजयासाठी सर्व प्रयत्न करतील. या सामन्याच्या आधी संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड माध्यमांशी बोलत होता. यावेळी त्याने सांगितल्याप्रमाणे बांगलादेश संघाला भारत हलक्यात घेऊ शकत नाही. द्रविडने यावेळी केएल राहुलविषयी देखील महत्वाची प्रतिक्रिया दिली. 

बांगलादेशविरुद्धचा हा सामना भारतीय संघाचा टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मधील चौथा सामना होता. या सामन्याआधी आयोजित केल्या गेलेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड बोलत होते. भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल (Rahul Dravid) टी-20 विश्वचषकात अपेक्षित प्रदर्शन करताना दिसत नाहीये. राहुल खराब फॉर्ममध्ये असल्यामुळे चाहते त्याच्यावर निशाणा साधत आहेत. अनेकजण राहुलला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याची मागणी करत आहेत. परंतु द्रविडच्या मते राहुल भारतीय संघाचा महत्वाचा फलंदाज आहे आणि संघ त्याला पाठिंबा देण्याचे काम करत आहे.

संघाच्या चौथ्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना राहुल द्रविड म्हणाले की, “बांगालदेश एक चांगला संघ होता. आता या सामन्याला हलक्यात घेता येणार नाहीये.” केएल राहुलविषयी बोलताना द्रविड म्हणाला की, “केएल राहुल अप्रतिम खेळाडू आहे आणि आम्ही त्याला समर्थन देत आहोत. तो बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात देखील सलामीला येईल. केएल राहुलला आम्ही ब्रिस्बेनमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये पाहिले आहे. सराव सामन्यात त्याने चांगल्या धावा केल्या होत्या.”

भारताच्या श्रेत्ररक्षणाविषयी देखील द्रविडने महत्वाची प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “पाकिस्तानविरुद्ध खेळताना आम्ही चांगली फिल्डिंग केली. आम्ही मागच्या सामन्यात काही चुका केल्या. आता त्या सुधारण्याची गरज आहे.” सध्या सोशल मीडियावर विराट कोहली () याच्या हॉटेल रूमचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. विराटने देखील हा व्हिडओ शेअर करून नाराजी व्यक्त केली. त्याच्याच एका चाहत्याने हा व्हिडिओ काढला असून विराटला ही गोष्ट चांगलीच खटकल्याचे दिसते. द्रविडने देखील यावेळी बोलताना या व्हिडिओविषयी नाराजी व्यक्त केली. “हे निराशाजनक आहे. हा एक चांगला अनुभव नक्कीच नाहीये. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे,” असे द्रविड पुढे बोलताना म्हणाले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अवघड असतं बाबा! संघातील खेळाडूंना असा हाताळतो रोहित? स्वतःच केला खुलासा
सुरेश रैना पुन्हा पाडणार चौकार-षटकारांचा पाऊस! अबू धाबी टी-10 लीगमध्ये ‘या’ संघासोबत केला करार 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---