भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा सध्या इंग्लंडमध्ये वनडे चषक खेळत आहे. ससेक्स संघाकडून खेळणारा पुजारा या स्पर्धेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. भारतीय फलंदाजाने 4 सामन्यात 2 शतके ठोकली आहेत. इंग्लंडमध्ये आपल्या उत्कृष्ट फॉर्मने पुजारा पुन्हा एकदा भारतीय संघाचे दार ठोठावत आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याला कसोटी संघाचा भाग बनवण्यात आले नव्हते.
वनडे चषक स्पर्धेत ससेक्स संघाकडून खेळणाऱ्या चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) ने सॉमरसेट संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात नाबाद 117 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सॉमरसेट संघाने 50 षटकांत 6 गडी गमावून 318 धावा केल्या. अँड्र्यू उमेदने संघासाठी 119 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. प्रत्युत्तरात ससेक्स संघाने 48.1 षटकांत 6 गडी राखून लक्ष्य गाठले. संघासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या पुजाराने 11 चौकारांच्या मदतीने 117* धावा केल्या.
यापूर्वी डर्बीशायरविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात पुजाराने 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 56 धावांची तुफानी खेळी केली होती. यानंतर नॉर्थंट्सविरुद्धच्या सामन्यात पुजाराने 119 चेंडूंत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 106* धावा केल्या. पुजारा या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 4 सामन्यांच्या 4 डावात 151 च्या सरासरीने 302 धावा केल्या आहेत.
भारतीय संघाचा चौथ्या क्रमांकाचा प्रश्न पुजाराच्या रुपाने सुटेल
सध्याच्या स्थितीत भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजाच्या शोधात आहे. केएल राहुल, श्रेयश अय्यर आणि रिषभ पंत हे भारतीय संघाचे अनुभवी खेळाडू आहेत. परंतु त्यांच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह कायम आहेत. अशातच आता पुजाराने इंग्लंडमधील फलंदाजीच्या जोरावर थेट भारतीय संघाच्या निवडकर्त्यांचे नजरा आपल्याकडे वळवल्या आहे. त्यात पुजारा अनुभवी खेळाडू असल्यामुळे भारतीय संघ चौथ्या क्रमांकासाठी पुजाराला विश्वचशकात संधी देणार का? हे पहावे लागेल.
पुजाराला खराब फॉर्ममुळे भारतीय संघातून वगळण्यात आले
पुजाराने भारतीय संघासाठी शेवटचा सामना आयसीसी जागतीक कसोटी अजिंक्यपदमध्ये खेळला होता. ज्यामध्ये तो पूर्णपणे अपयशी ठरला होता. या सामन्यात पुजाराने पहिल्या डावात 14 आणि दुसऱ्या डावात 27 धावा केल्या. यानंतर टीम इंडियाने वेस्ट इंडिज दौऱ्यावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली, ज्यामध्ये पुजाराला संघातून वगळण्यात आले. (indian test Batsman cheteshwar pujara scored 2nd hundred in england oneday cricket match)
महत्वाच्या बातम्या-
केएल राहुलची आशिया चषकसाठी तयारी, परंतु त्या आधी द्यावी लागणार अग्नि परीक्षा
मुकेश कुमार तिन्ही फॉरमॅटसाठी रेडी! वर्कलोडबाबत गोलंदाजी प्रशिक्षकांच्या डोक्यात विचार सुरू