भारतीय संघाचा फलंदाज केएल राहुल दुखापतीमुळे भारतीय संघातून अनेक दिवसांनपासून संघाच्या बाहेर आहे. पण आता तो बरा झाला आहे आणि परत येण्याच्या तयारीत आहे. आशिया चषक 2023 साठी राहुल भारतीय संघामध्ये सामील होण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी राहुलला फिटनेस टेस्ट पास करावी लागणार आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनरागमन करण्यासाठी राहुलने खूप मेहनत घेतली आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, केएल राहुल (Kl Rahul) सराव सामन्यात भाग घेणार आहे. तो सध्या नेटमध्ये फलंदाजी करत असून त्यासोबत यष्टीरक्षणही करत आहे. राहुलची 18 ऑगस्टला फिटनेस चाचणी होणार आहे. त्यानंतरच संघ व्यवस्थापन आणि निवडकर्ते त्याच्या पुनरागमनाबाबत निर्णय घेतील. आशिया चषक 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यामध्ये भारतीय संघ 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
राहुलसोबतच श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ही दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर आहे. पण अय्यरच्या पुनरागमनाबद्दल अजून काही सांगता येणार नाही. त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. भारतीय संघ अय्यरला मधल्या क्रमांकावर खेळवू शकला आसता . पण त्याचा फिटनेस हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. अय्यरच्या फिटनेसबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
राहुल आणि अय्यरच्या अनुपस्थितीत भारताने तिलक वर्मा आणि संजू सॅमसनला संधी दिली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना तिलकने चमकदार कामगिरी केली आहे. मात्र, आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेसाठी त्याला संघात स्थान मिळेल की नाही याबाबत अद्याप काही सांगता येणार नाही.
आशिया चषक 2023 चा पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळमध्ये होणार आहे. यानंतर 2 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ नेपाळविरुद्ध मैदानात उतरेल. भारत विरुद्ध नेपाळ सामना 4 सप्टेंबरला पल्लेकेले येथे होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना कोलंबो येथे होणार आहे. (indian cricketer kl rahul fitness test before asia cup 2023)
महत्वाच्या बातम्या-
पहिले रोहित आता विराट! आपल्या पदार्पणातच तिलकला दिग्गज खेळाडूंचे रेकॉर्ड मोडण्याची संधी
“संजूला वर्ल्डकपसाठी भारतीय संघात जागा मिळणार नाही”, दिग्गजाने व्यक्त केला ठाम विश्वास