गॉल – श्रीलंकेतील गॉल येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा ३०४ धावांनी धावांनी पराभव केला. या विजयाबरोबर भारताने मालिकेत १-० अशी आघडी घेतली आहे.
परंतु या विजयाबरोबर भारताने एका अशा विक्रमाची बरोबरी केली आहे ज्यासाठी अनेक पाहुणे संघ उत्सुक असतात. यजमान देशात त्यांच्याविरुद्ध त्यांच्याइतके किंवा त्यांच्यापेक्षा जास्त सामने जिंकण्याचा विक्रम भारताला आजपर्यँत केवळ दोन वेळा करता आला आहे.
भारताने यापूर्वी बांग्लादेशात ८ पैकी ६ कसोटी सामने जिंकले आहेत तर यजमान बांग्लादेशला एकही सामना जिंकता आलेला नाही. भारताने झिम्बाब्वेमध्ये ६ पैकी ३ कसोटी सामने जिंकले असून यजमान झिम्बाब्वेने २ कसोटी सामने आपल्या नावावर केले आहेत.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीमधील विजयाने भारताने श्रीलंकेत २२ कसोटी सामन्यांपैकी ७ सामने जिंकले असून यजमान लंकेनेसुद्धा तेवढेच अर्थात ७ सामने जिंकले आहेत.
श्रीलंका, झिम्बाब्वे आणि बांग्लादेश सोडून अन्य कोणत्याही देशात भारताला यजमान संघापेक्षा जास्त सामने जिंकता आलेले नाही. भारतीय संघाला सर्वात जास्त पराभव हे इंग्लंड(३०), ऑस्ट्रेलिया (२८) आणि वेस्ट इंडिज (१६) पाहावे लागले आहेत.