---Advertisement---

हार्दिक पंड्याच्या स्थानासाठी भारताकडे ‘या’ खेळाडूचा पर्याय तयार, प्रशिक्षकांनी दिले संकेत

On: गुरूवार, मे 13, 2021 2:56 PM
---Advertisement---

भारतीय संघ आगामी जून महिन्यात इंग्लंडमध्ये न्यूझीलंड विरूद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. त्यानंतर ऑगस्ट मध्ये इंग्लंड विरूद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका देखील खेळणार आहे. यासाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली.
मात्र या संघात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची निवड करण्यात आली नाही. त्याचे नाव नसल्याचे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र तो सध्या गोलंदाजी करत नसल्याने हार्दिकला संघात जागा नसल्याचे स्पष्ट झाले. परंतु आता भारतीय संघ हार्दिक पंड्याच्या जागी पर्यायी खेळाडू तयार करत असल्याचे समोर आले आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकांनीच याचा खुलासा केला आहे.

अष्टपैलू खेळाडूच्या स्थानासाठी सक्षम पर्याय
हार्दिक पंड्या भारताच्या कसोटी संघात अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावत होता. खालच्या फळीत फलंदाजीसह तो उपयुक्त मध्यमगती गोलंदाजी देखील करायचा. मात्र गेल्या काही काळापासून त्याच्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे तो गोलंदाजी करत नाही आहे. याच कारणामुळे त्याला कसोटी संघात जागा देखील मिळत नाही आहे. मात्र आता भारतीय संघाकडे त्याच्या जागेसाठी सक्षम पर्याय उभा राहिला आहे. हा पर्याय म्हणजे अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर.

भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनीच याबाबत उलगडा केला. एका वृत्तसंस्थेशी बोलतांना ते म्हणाले, “पुढचा पर्याय काय असेल, याचा निर्णय निवड समिती घेईल. पर्याय शोधणे हे निवड समितीचे काम आहे. पुढे त्यांना घडवणे, हे आमचे काम आहे. पण हे मान्य करावे लागेल की शार्दूल ठाकूरने त्याची दावेदारी पेश केली आहे. त्याने हे सिद्ध केले आहे की तो एक चांगला अष्टपैलू खेळाडू होऊ शकतो. त्याने ऑस्ट्रेलियात जी कामगिरी केली, ती कौतुकास्पद होती.”

हार्दिक पंड्यासारखे खेळाडू शोधणे कठीण
मात्र यावेळी भरत अरुण यांनी हार्दिक पंड्याचे देखील कौतुक केले. त्याच्यासारखे खेळाडू शोधणे कठीण आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. हार्दिकने आपला शेवटचा कसोटी सामना २०१८ साली इंग्लंड विरूद्ध खेळला होता. त्यानंतर मात्र एकाही कसोटी सामन्यात त्याला स्थान मिळाले नाही. भरत अरुण म्हणाले, “माझी इच्छा आहे की गोलंदाजांनी हार्दिक सारखे व्हावे. हार्दिककडे असामान्य प्रतिभा आहे. मात्र दुखापतीमुळे त्याला ऑपरेशन देखील करावे लागले. अशा परिस्थितीत पुनरागमन करणे नक्कीच सोपे नाही.”

महत्त्वाच्या बातम्या – 

श्रीलंका दौरा निश्चित असतांना इंग्लंड दौऱ्यासाठी का निवडले हे खेळाडू? बीसीसीआयवर होते आहे टीका

आता बहुधा फक्त भारतीय खेळाडूच खेळणार उर्वरित आयपीएल हंगाम, या कारणामुळे बीसीसीआयच्या अडचणीत वाढ

कसोटी क्रमवारीत भारताने कायम राखले अव्वल स्थान, या संघांची झाली घसरण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---