भारत आणि बांगलादेश या संघातील दुसरा कसोटी सामना मीरपूर येथे खेळवला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाअखेर 4 बाद 45 धावा झालेल्या आहेत. अजूनही भारताला विजयासाठी 100 धावांची गरज आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले. भारताला दुसऱ्या डावात विजयासाठी 145 धावांची गरज असताना भारताचेे पहिले चार फलंदाज एकेरी धावसंख्या करत तंबूत परतले. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय संघाची जबाबदारी रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्या खांद्यावर असणार आहे. पहिल्या डावात रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सांभाळला, ज्यामुळे भारतीय संघाला 314 धावा करता आल्या.
भारत आणि बांगलादेश या संघांमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला बांगलादेशने बिनबाद 7 या धावसंख्येपासून सुरुवात केली. त्यांच्या पहिल्याच सत्रात 71 धावांवर 4 गडी गमावले. त्यानंतर त्यांचा पूर्ण संघ 231 धावांवर सर्वबाद झाला. याआधी बांगलादेशने पहिल्या डावात 227 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात भारताने आपले पहिले 4 गडी लवकर गमावले होते. त्यावेळी रिषभ पंत (Rishabh Pant) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी डाव सांभाळला होता.
आता दुसऱ्या डावात देखील त्यांच्यावर भारताच्या फलंदाजीची जबाबदारी येऊ शकते, कारण दुसऱ्या डावातही भारताचे चार गडी अवघ्या 37 धावांवर गमावले होते. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय चाहत्यांच्या नजरा रिषभ आणि श्रेयसच्या जोडीवर असणार आहेत. रिषभने पहिल्या डावात 104 चेंडूत 93 धावा केल्या होत्या, ज्यात त्याने 7 चौकार आणि 5 उत्तुंग षटकार लगावले होते. त्याचबरोबर श्रेयसने 105 चेंडूत 87 धावांचे मौल्यवान योगदान दिले होते. या डावात त्याने 10 चौकार आणि 2 षटकार लगावले होते. दुसऱ्या डावात भारताला विजयासाठी 100 धावांची गरज असून 6 गडी अजून शिल्लक आहेत आणि 2 दिवसांचा खेळ बाकी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एवढे पैसे मिळणार म्हणून थरथर कापत होता अष्टपैलू, सांगितला आयपीएल लिलावाचा अनुभव
‘आरसीबी नेहमीच माझा संघ राहील, विराट आणि एबीडी…’, ख्रिस गेलची मोठी प्रतिक्रिया