आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ स्पर्धा (icc under 19 world cup) आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. नुकताच या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील सामने समाप्त झाले असून लवकरच उपांत्य फेरीला सुरुवात होणार आहे. शनिवारी (२९ जानेवारी) या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील अंतिम सामना भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवत, उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. यासह भारतीय (india) संघ उपांत्यफेरीत प्रवेश करणारा चौथा संघ ठरला आहे.
भारतीय संघासाठी हा सामना दोन कारणांसाठी अतिशय महत्वाचा होता. पहिलं कारण म्हणजे, हा सामना जिंकून भारतीय संघ या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणार होता. तर दुसरं कारण म्हणजे, भारतीय संघाला २०२० मध्ये झालेल्या अंतिम सामन्यातील पराभवाचा बदला घेण्याची सुवर्णसंधी होती. तसेच भारतीय संघातील गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आणि भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवून दिला. आता भारतीय संघाचा उपांत्यफेरीतील सामना ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होणार आहे.
व्हिडिओ पाहा- काय घडलं होतं भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये ।
कुठे आणि कधी रंगणार सामना ?
या स्पर्धेतील सुपर लीग प्लेऑफ उपांत्य फेरीतील पहिला सामना १ फेब्रुवारी रोजी एंटीग्वाच्या सर विवियन रिचर्ड्स स्टेडियममध्ये पार पडणार आहे. तर दुसरा सामना २ फेब्रुवारी रोजी कुलीज क्रिकेट मैदानावर रंगणार आहे. भारतीय संघासह, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अफगानिस्तान संघाने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
भारतीय संघाची लढत ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध
भारतीय संघाची सुपर लीग उपांत्यफेरीतील लढत ऑस्ट्रेलिया (india vs australia) संघाविरुद्ध रंगणार आहे. २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या दोन्ही संघांपैकी जो संघ विजय मिळवणार, तो आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. भारतीय संघासाठी आनंदाची बाब म्हणजे, ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झालेल्या सराव सामन्यात भारतीय संघाने सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव केला होता. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावलेला असेल.
आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या सुपर लीग उपांत्य फेरीतील पहिला सामना १ फेब्रुवारी रोजी इंग्लंड आणि अफगानिस्तान या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे. ज्याप्रकारे अफगानिस्तान संघाने उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात श्रीलंका संघाला पराभूत केले होते. त्यावरून इंग्लंड संघ अफगानिस्तान संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही.
महत्वाच्या बातम्या :
बाबोव! अंडर-१९ विश्वचषक सामन्यादरम्यान भूकंपाचे जोरदार झटके, हादरले मैदान; तरीही मॅच
‘त्या’दिवशी चेन्नईमधील चेपॉक मैदानात सेहवागने वॉर्नची अक्षरशः पिसे काढली
हे नक्की पाहा: