---Advertisement---

क्या बात है! भारताची ‘ही’ महिला खेळाडू आहे धोनीच्या ‘पावर हिटिंग’ची फॅन, ठोकलंय सर्वात वेगवान अर्धशतक

Richa-Ghosh-And-MS-Dhoni
---Advertisement---

भारतीय महिला संघाची (Indian Women’s Team) यष्टीरक्षक फलंदाज ऋचा घोष (Richa Ghosh) हिने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याला स्वतःचा आदर्श म्हटले आहे. भारतीय संघाने न्यूझीलंड दौऱ्यात निराशाजनक प्रदर्शन केले, पण ऋचाने स्वतःच्या नावावर एक मोठा विक्रम केला आहे. तिने अवघ्या २६ चेंडूत अर्धशतक केले आणि भारतीय महिला क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करणारी खेळाडू बनली. बीसीसीआयने ऋचाचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.

कर्णधार मिताली राज (Mithali Raj) आणि ऋचा घोष यांचा हा व्हिडिओ बीसीसीआयने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला गेला आहे. मितालीने ऋचाला विचारले की, ती कोणाला स्वतःचा आदर्श मानते? यावर उत्तर देताना ऋचा म्हणाली की, “आधी मी माझ्या वडिलांना फॉलो करायचे. मी सुरुवात वडिलांसोबत खेळून केली होती. तेदेखील अगोदर खेळायचे. त्यानंतर हळूहळू जेव्हा मी भारताचे सामने पाहायला सुरुवात केली, तेव्हा मी त्यांच्या (एमएस धोनी) पावर हिटिंगने जास्त प्रभावित झाले. त्यानंतर मी धोनी यांना फॉलो करायला सुरुवात केली.”

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धचा चौथा एकदिवसीय सामना ऋचा घोषसाठी अप्रतिम राहिला होता. हा सामना पावसामुळे २० षटकांचा केला गेला होता. भारताला १९२ धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघ १२८ धावांवर सर्वबाद झाला आणि ६३ धावांनी पराभूत झाला. असे असले, तरीही ऋचाने या सामन्यात २९ चेंडूत ५२ धावा केल्या आणि स्वतःचे अर्धशतक अवघ्या २६ चेंडूत पूर्ण केले. हे भारतीय महिला खेळाडूंद्वारे केले गेलेले सर्वात वेगवान अर्धशतक होते. यापूर्वी हा विक्रम भारताच्या रुमेली धर यांच्या नावावर होता. रुमेलीने २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध २९ चेंडूत अर्धशतक केले होते.

ऋचाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर तिने भारतासाठी आतापर्यंत ७ एकदिवसीय आणि १३ टी२० सामने खेळले आहेत. एकदिवसीयमध्ये तिच्या नावावर २२२, तर टी२० मध्ये १८० धावा आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ती बंगाल संघाचे प्रतिनिधित्व करते. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या या एकदिवसीय मालिकेचा विचार केला, तर भारताने मालिकेतील पहिल्या चार सामन्यांमध्ये पराभव पत्करला होता. अखेर गुरुवारी (२४ फेब्रुवारी) संघाला मालिकेतील पहिला विजय मिळाला. न्यूझीलंडने मालिका ४-१ अशा फरकाने जिंकली.

महत्वाच्या बातम्या-

केवळ तिलकरत्ने दिल्शानला जमलेला तसा विक्रम न्यूझीलंडच्या एमीलिया केरने केलाय, तोही भारताविरुद्ध

शेन वॉर्नसाठी सचिन नाहीये ‘गॉड ऑफ क्रिकेट’, पाहा कोणाचं घेतलंय नाव

टी२०मध्ये ७००० धावा अन् २०० विकेट्स! पाकिस्तानी क्रिकेटपटूची छोट्या क्रिकेट प्रकारात मोठी कामगिरी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---