भारत आणि इंग्लंड यांच्यात मालिकेतील चौथा कसोटी सामना अहमदाबादमध्ये खेळवला जात आहे. या मालिकेत भारतीय संघ २-१ ने पुढे आहे. तसेच हा सामना जिंकून भारतीय संघ, लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल होऊ शकतो. त्यामुळे हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. अशातच सामन्याच्या पहिल्याच दिवशी विराट कोहलीचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
अहमदाबादमध्ये खेळविण्यात येत असलेल्या, भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार कोहली याच्यासारखा हुबेहूब दिसणारा व्यक्ती सामना पाहण्यासाठी आला होता. त्याने कोहलीची १८ क्रमांकाची जर्सी देखील घातली होती. त्यामुळे अनेकांनी त्याला कोहलीच समजले होते. तसेच त्याच्यासोबत फोटो देखील काढले. या कोहलीसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या चाहत्याचा स्टेडियम बाहेरील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
यापूर्वी देखील कोहली सारखे दिसणारे अनेक व्यक्ती पहायला मिळाले आहेत. एक व्यक्ती पाकिस्तानमध्ये देखील आहे. तो हुबेहूब कोहलीसारखाच दिसतो. त्याने कोहलीसारखी दाडी ठेवली आहे. तसेच त्याचे चालणे बोलणे अगदी कोहलीसारखेच आहे. त्याला पाहून कोणालाही वाटेल की चक्क विराट कोहलीच त्याच्यासमोर उभा आहे. हे चाहते आपल्या आवडत्या खेळाडू सारखे दिसण्यासाठी स्वतःमध्ये अनेक बदल घडवून आणत असतात.
The number of Virat Kohli lite we've seen till date>>>???????? pic.twitter.com/RcckFBB9g5
— ????????♀️ (@anushkaalol) March 4, 2021
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला चुकीचे ठरवत भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत इंग्लंड संघाचा डाव २०५ धावांवर संपवला होता.
प्रत्युत्तरात पहिल्या दिवसाखेर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा हे दोघेही नाबाद राहिले. तर शुबमन गिल शून्यावर बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात भारतीय संघाने चार मुख्य फलंदाज गमावले आहेत. रोहित शर्मा एकतर्फी झुंज देत होता. परंतु त्याचे अर्धशतक हुकले. तर दुसरीकडे चेतेश्वर पुजारा अवघ्या १७ धावा करत बाद झाला. विराट कोहली शून्य धावा करत माघारी परतला. तसेच अजिंक्य रहाणे याने २७ धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी चॅम्पियनशिपमध्ये रोहितचा डंका, कोणालाही न जमलेल्या विक्रमाला घातली गवसणी






