भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आणि पत्नी अथिया शेट्टी यांनी मुंबईत फ्लॅट खरेदी केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय क्रिकेटरच्या या फ्लॅटची किंमत सुमारे 20 कोटी रुपये आहे. या खरेदीमुळे केएल राहुल आणि अथिया शेट्टी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आमिर खानचे शेजारी बनले. राहुल आणि अथिया शेट्टीने मुंबईतील पॉश भाग असलेल्या पाली हिलमध्ये फ्लॅट घेतला आहे. हा परिसर वांद्रे (पश्चिम) उपनगराचा भाग आहे.
केएल राहुलचा नवीन फ्लॅट 3,350 स्क्वेअर फूट आहे. राहुल आणि अथियाची ही मालमत्ता वांद्र्याच्या पाली हिल येथील संधू पॅलेस बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर आहे. पाली हिलमध्ये शाहरुख खान, सैफ अली खान, सलमान खान, जान्हवी कपूर आणि तृप्ती डिमरी यांचेही वांद्रे येथे अपार्टमेंट आहेत. याशिवाय अनेक बडे व्यापारीही येथे राहतात. आमिर खानने गेल्या महिन्यातच येथे एक अपार्टमेंट खरेदी केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिर खानच्या अपार्टमेंटची किंमत जवळपास 9.75 कोटी रुपये होती.
केएल राहुलला जूनमध्ये खेळल्या गेलेल्या 2024 टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले नाही. राहुलच्या जागी रिषभ पंत आणि संजू सॅमसनचा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. राहुलने भारताकडून शेवटचा सामना जानेवारी 2024 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळला होता.
आता श्रीलंका दौऱ्यावर केएल राहुलच्या पुनरागमनाची पूर्ण आशा आहे. टीम इंडिया या महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर 3 सामन्यांची टी20 आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. केएल राहुलला वनडे मालिकेत संघाचा भाग बनवले जाऊ शकते. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात राहुल टीम इंडियाचा मुख्य यष्टिरक्षक फलंदाज होता.
महत्तवाच्या बातम्या-
मुंबईच्या स्टार ओपनरची श्री समाधी मंदिराला भेट, वाढदिवसादिवशी ईशान किशन साई चरणी लीन
बार्कलेनंतर जय शहा सांभाळणार आयसीसीचे अध्यक्षपद? आयसीसी वार्षिक बैठकीत निर्णय होण्याची शक्यता
कोणत्याही बापावर अशी वेळ येऊ नये..! लाडक्या लेकीच्या वाढदिवशी मोहम्मद शमीचा इमोशनल मेसेज