---Advertisement---

मुंबईच्या स्टार ओपनरची श्री समाधी मंदिराला भेट, वाढदिवसादिवशी ईशान किशन साई चरणी लीन

---Advertisement---

भारतीय संघाची विकेटकीपर फलंदाज ईशान किशनने आपल्या वाढदिवसा दिवशी श्री समाधी मंदिराला भेट दिला आहे. मुंबई इंडियन्सचा स्टार सालमी फलंदाज 26 वर्षे पूर्ण करुन 27 व्या वर्षात पदार्पण केला आहे. ईशान किशनने आपल्या इंस्टाग्रमावरुन मंदिराला भेट दिलेले फोटो शेअर केला आहे. 18 जुलै रोजी ईशान किशन आपला वाढदिवस साजरा करतो.

सध्या भारतीय संघातून बाहेर असेल्याला इशान किशनने त्याच्या 27व्या वाढदिवसानिमित्त श्री समाधी मंदिर, शिर्डीला भेट दिला आहे.  किशनने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केला आहे आणि पोस्टला “श्रद्धा आणि सबुरी” असे कॅप्शन दिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ishan Kishan (@ishankishan23)

ईशान किशनसाठी हे वर्ष त्याच्या कारकिर्दीच्या दृष्टीने खडतर ठरले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, श्रेयस अय्यरसह, किशनला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) केंद्रीय करारातून वगळण्यात आले होते. आयपीएल 2024 मध्ये देखील ईशाम किशनची कामगिरी साधारण  राहिले होते. त्याने 14  सामन्यात 320 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये 69 धावासंख्या ही त्याची सर्वोच्च खेळी होती.

ईशन किशन अलिकडेच कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाहीये. किशनने नोव्हेंबरमध्ये भारतासाठी टी20 शेवटचा टी20 सामना खेळला होता. त्याच बरोबर गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेच्या संघासाठी तो भारतीय संघाचा भाग होता पण ‘वैयक्तिक कारणांमुळे’ तो बाहेर पडला होता.  तर ऑक्टोबर 2023 मध्ये ईशानने शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.

महत्तवाच्या बातम्या-

बार्कलेनंतर जय शहा सांभाळणार आयसीसीचे अध्यक्षपद? आयसीसी वार्षिक बैठकीत निर्णय होण्याची शक्यता
कोणत्याही बापावर अशी वेळ येऊ नये..! लाडक्या लेकीच्या वाढदिवशी मोहम्मद शमीचा इमोशनल मेसेज
रिषभ पंतची टी20 संघातून सुट्ठी? या यष्टीरक्षक फलंदाजाला पहिली पसंती; उपकर्णधार पदासाठी देखील दावेदार

 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---