भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक हा नेहमी भारतीय संघाच्या आत बाहेर होत असायचा. महेंद्रसिंह धोनी संघात येण्याआधी कार्तिकला अनेक संधी मिळाल्या होत्या. पण तो त्या संधीचा फायदा घेऊ शकला नाही. जेव्हा धोनी संघात आला, तेव्हा त्याने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन संघात आपले स्थान पक्के केले. मात्र यानंतरही कार्तिकला संधी मिळाल्या पण तो संघात कायमचे आपले स्थान निश्चित करू शकला नाही. नुकतेच भारतीय संघाचा माजी सलामीवीर आकाश चोप्राला दिलेल्या मुलाखतीत कार्तिकने आपल्या कारकिर्दीविषयी अनेक खुलासे केले आहेत.
कार्तिकने आकाश चोप्राच्या यूट्यूब चॅनेलवर अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. दरम्यान धोनीमुळे आपल्यासाठी भारतीय संघाचे सगळे दरवाजे बंद झाल्याचे खळबळजनक वक्तव्यही त्याने केले आहे.
आपल्या भविष्याविषयी तो म्हणाला की, “मी माझ्या गोष्टींकडे कधीच लक्ष देत नाही. माझा स्वभाव नेहमी असाच राहिला आहे. पुढे काय होईल? हा नेहमीच माझ्यासाठी वारंवार पडणारा प्रश्न आहे. त्यावेळी मला एक मजबूत फलंदाज बनायचे होते. संघात मधली फळी आणि सलामीवीर अशा दोन जागा रिकाम्या होत्या. धोनीसह लोकांनी मला एक गोष्ट सांगितली की, तू फलंदाज म्हणून खूप प्रतिभावान आहेस. तू सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानात उतरू शकतो. यामुळे मला खूप आत्मविश्वास मिळाला. मग राहुल द्रविडने असेही म्हटले की तुझ्यात शुद्ध फलंदाज होण्याची क्षमता आहे. म्हणून मी देशांतर्गत क्रिकेटमध्ये गेलो, खूप धावा केल्या. त्यानंतर सलामीवीर म्हणून संधी मिळाली आणि मी चांगली कामगिरीही केली केले.”
कार्तिकने असेही म्हटले की, धोनीने त्यावेळी संपूर्ण जगभरात आपल्या कामगिरीची छाप सोडली होती. त्यामुळे कार्तिकला माहित होते की, आता संघात इतर कोणत्याही यष्टीरक्षक फलंदाजासाठी स्थान बंद झाले आहे.
तो पुढे म्हणाला की, “जेव्हा धोनी आला, तेव्हा त्याने आपल्या कामगिरीने संपूर्ण क्रिकेटविश्वाला प्रभावित केले होते. मला माहित होते की आता यष्टीरक्षक फलंदाज म्हणून माझ्यासाठी संघाचे दरवाजे बंद झाले आहेत. अनेक दशकांनंतर आम्हाला एक चांगला यष्टीरक्षक मिळाला. इयान हिली किंवा ऍडम गिलख्रिस्टकडे पाहा, जर तुम्ही चांगला यष्टिरक्षक असाल तर तुम्ही १०-१२ वर्षे संघाचा भाग होऊ शकता.”
महत्त्वाच्या बातम्या-
विजयाची संधी हुकली तरीही कोहली अन् शास्त्री असतील खुश! कारणंही आहेत तितकीच समर्पक
कोच राहुल द्रविड बनले ‘कन्नड टिचर’, चक्क ब्रिटिश उच्चायुक्ताला दिले धडे; व्हिडिओ तूफान व्हायरल
WTC पाँईट टेबल: पहिली कसोटी अनिर्णीत राहिल्याने टीम इंडियाचे ‘मोठे’ नुकसान, वाचा सविस्तर