मागील काही दिवसांपूर्वी भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. त्या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड देखील या दौऱ्यावर गेला होते. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने श्रीलंका संघाविरुद्ध एकदिवसीय आणि टी२० मालिका खेळली होती. यामध्ये भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत २-१ ची आघाडी घेऊन मालिका जिंकली. पण टी२० मालिकेत त्यांना १-२ ने पिछाडी पत्करावी लागली असून पराभवाला सामोरे जावे लागले. या दौऱ्यानंतर आता द्रविडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्रशिक्षक राहुल द्रविड ‘कन्नड शिक्षक’
या व्हायरल व्हिडिओमध्ये राहुल द्रविड भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त ऍलेक्स एलिस यांना कर्नाटकची स्थानिक भाषा कन्नड शिकवताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ ऍलेक्स एलिस यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केला आहे.
एलिस अलीकडेच बेंगळुरूला आले होते. येथे त्यांनी द्रविडची भेट घेतली असून त्यांच्यासोबतच्या मजेशीर संवादाचा व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी लाखो भारतीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. बेंगळुरूचा स्थानिक खेळाडू असल्याने द्रविड कदाचित सर्वोत्तम व्यक्ती होता, ज्याच्याकडून एलिस क्रिकेटची वाक्ये कन्नड भाषेत शिकू शकले आहेत. द्रविडने एलिस यांना कन्नड भाषेतील एक शब्द शिकवला आहे, तो म्हणजे, ‘बेगा ओडी.’ याचा अर्थ ‘एक धाव’ असा होतो.
हा व्हिडिओ शेअर करताना एलिस यांनी लिहिले की, ‘भारतीय भाषांमध्ये क्रिकेट एक्सप्रेशन भाग २. आज आम्ही बंगलोरमध्ये आहोत. इथे ‘द कोच’ राहुल द्रविडपेक्षा चांगला शिक्षक आणखी कोण असू शकतं, ज्याने मला कन्नड भाषेचा एक शब्द शिकवला आहे.’
Cricket expressions in Indian languages part 2.
Today, we’re down south in Bengaluru.
What better teacher than ‘The Coach’ #RahulDravid, who taught taught me this in #Kannada ಕನ್ನಡ ???? pic.twitter.com/tDCtHOcIwa
— Alex Ellis (@AlexWEllis) August 7, 2021
दरम्यान द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने श्रीलंका दौऱ्यात चमकदार कामगिरी केली आहे. एकदिवसीय मालिकेतील यशानंतर शिखर धवन आणि संघाकडे टी२० मालिका जिंकण्याचीही संधी होती. त्यांनी मालिकेतील पहिलाच टी२० सामना जिंकत रणशिंगही फुंकले होते. मात्र दुसऱ्या टी२० सामन्यापूर्वी अष्टपैलू कृणाल पंड्या कोरोनाच्या विळख्यात सापडला. त्यामुळे त्याच्या संपर्कातील संघातील ८ प्रमुख खेळाडूंना विलगीकरणात राहावे लागले. परिणामी नवख्या खेळाडूंसह भारतीय संघाला विशेष कामगिरी करता आली नाही आणि मालिकेत १-२ ने त्यांचा पराभव झाला.
असे असले तरीही, आगामी टी२० विश्वचषकानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा उत्तराधिकारी म्हणून द्रविडकडे पाहिले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
WTC पाँईट टेबल: पहिली कसोटी अनिर्णीत राहिल्याने टीम इंडियाचे ‘मोठे’ नुकसान, वाचा सविस्तर
बुमराहविषयी विचारलेला प्रश्न ऐकून चकित झाला राहुल; म्हणाला, ‘सर, मला माहिती नाही’
भारत विजयपथावर असताना पहिली कसोटी ड्रॉ; कोहली म्हणाला, ‘अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे की..’