अहमदाबाद येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीदरम्यान भारतीय संघाच्या खेळाडूकडून मोठी चूक झाली. ती अशी की, यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत याने ट्रेविस हेड याचा एकदम सोपा ‘लॉलीपॉप झेल’ सोडला. यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
झालं असं की, ऑस्ट्रेलियाच्या डावातील सहावे षटक भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) टाकत होता. यावेळी उमेशने ट्रेविस हेड (Travis Head) याला चकवले आणि चेंडू बॅटला लागून यष्टीरक्षकाकडे गेला. मात्र, केएस भरत (KS Bharat) याने सोपा झेल सोडला. भरतने सोडलेल्या सोप्या झेलामुळे उमेशही निराश झाला. तसेच, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) शांत राहून भरतकडे पाहत राहिला.
खरं तर, भरतने या मालिकेदरम्यान काही खास कामगिरी केली नसल्याचे दिसते. अशात नेटकरीही सोशल मीडियाद्वारे त्याच्यावर टीकास्त्र डागत आहेत. अनेकांना यावेळी रिषभ पंत याची आठवण झाली. नेटकऱ्यांनी मीम्स शेअर केले आहेत. काहींनी असेही म्हटले आहे की, केएस भरत हा वृद्धिमान साहासारखा चांगला यष्टीरक्षक नाहीये. एकाने असेही लिहिले की, “केएस भरत हा तुमचा यष्टीरक्षक फलंदाज किंवा फलंदाज यष्टीरक्षक नाही. भारताला ऋषभ पंतची उणीव भासत आहे.”
KS Bharat is neither your keeper batsman nor batsman keeper. India dearly missing Rishabh Pant #INDvAUS
— Krishna (@krishnamroy) March 9, 2023
Anyone can drop catches, but KS Bharat is not as good a keeper as Wriddhiman Saha.
Since he hasn't come with the reputation of a flamboyant batsman, people have automatically thought he must be a world class keeper. (And exact opposite for Ishan)
— Geopolitik (@geopolitiik) March 9, 2023
KS Bharat was given a vote of confidence by Rohit Sharma yesterday. He's not backed it up so far today.#INDvAUS
— Andrew McGlashan (@andymcg_cricket) March 9, 2023
https://twitter.com/LucasR32sky/status/1633697674859016192
सामन्याबाबत बोलायचं झालं, तर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी दुसऱ्या सत्रातील 46व्या षटकापर्यंत 2 विकेट्स गमावत 110 धावा चोपल्या. यातील दोन विकेट्स भारताच्या मोहम्मद शमी आणि आर अश्विन यांनी घेतल्या.
खरं तर, भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या खास सामन्याला भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनीही हजेरी लावली होती. यावेळी दोन्ही पंतप्रधानांनी आपापल्या कर्णधारांना कसोटी टोपी देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच, दोघांचाही हात उचलून कसोटी सामन्याला सुरुवात केली. (indian wicketkeeper srikar bharat drop easy catch on umesh yadavs ball captain see video)
चौथ्या कसोटीसाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव
ऑस्ट्रेलिया-
ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरून ग्रीन, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, मॅथ्यू कुह्नेमन, नेथन लायन
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! गुजरातची कर्णधार WPLमधून बाहेर, स्टार खेळाडूने घेतली जागा; नेतृत्व भारतीय क्रिकेटरकडे
पंतप्रधान मोदी-अल्बानीज यांनी वाढवली भारत-ऑस्ट्रेलियातील चौथ्या कसोटीची शोभा, कर्णधारांना दिल्या खास टोप्या






