---Advertisement---

एवढा मोठा फरक! संपूर्ण भारतीय महिला संघाचे वार्षिक मानधन आहे एकट्या कोहलीच्या पगारापेक्षाही कमी

On: गुरूवार, मे 20, 2021 12:21 PM
---Advertisement---

बुधवारी (१९ मे) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने २०२०-२१ साठी करारबद्ध केलेल्या महिला खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण १९ खेळाडूंना जागा मिळाली असून त्यांना ३ श्रेणींमध्ये विभागले गेले आहे. हा करार ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ पर्यंत करण्यात आला आहे. परंतु करारबद्ध महिला खेळाडूंची ताजी यादी पाहता बीसीसीआय दुजाभाव करत असल्याचे दिसत आहे. भारतीय महिला संघाचे एकूण वार्षिक मानधन हे एकट्या विराट कोहलीच्या वार्षिक मानधनापेक्षाही कमी आहे.

भारतीय पुरुष संघाचा कर्णधार विराट कोहली याला बोर्डाकडून वर्षाचा ७ कोटी इतका पगार मिळतो. तर भारतीय संघाच्या ताज्या वार्षिक कराराची एकूण किंमत ५.१० कोटी अर्थात एकट्या विराटच्या पगारापेक्षा १.९० कोटी रुपये कमी आहे. भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज हिच्या वार्षिक पगाराची किंमत पाहायची झाली तर, तिला नव्या करारानुसार वर्षाला ३० लाख रुपये मिळणार आहेत. म्हणजे विराटपेक्षा जवळपास २३ पट कमी मानधन तिला दिले जाणार आहेत.

एवढेच नव्हे तर, पुरुष क्रिकेटपटूंमध्ये जे खेळाडू सर्वोच्च श्रेणी म्हणजेच अ+ श्रेणीचे खेळाडू आहेत, त्यांना वार्षिक ७ कोटी रुपये मिळतात. म्हणजेच सर्वोच्च श्रेणीतील महिला खेळाडूंपेक्षा त्यांची पगार १४ पटीने जास्त आहे. तर क श्रेणीतील महिला क्रिकेटपटूंचे मानधन आणि अ+ श्रेणीच्या पुरुष क्रिकेटपटूंच्या वार्षिक मानधनामध्ये जवळपास ७० पटींचा अंतर आहे.

अशी आहे भारतीय महिला संघाची नवी वार्षिक करार यादी
भारतीय महिला खेळाडूंच्या नव्या वार्षिक करारामधील सहभागी खेळाडूंची संख्याही कमी करण्यात आली आहे. गतवर्षी २२ खेळाडूंना हा करार मिळाला होता. परंतु यावेळी खेळाडूंची संख्या कमी करत ती १९ वर आणली आहे. यात अ श्रेणी ३, ब श्रेणीमध्ये १० आणि क श्रेणीमध्ये ६ खेळाडू आहेत. अ श्रेणीच्या खेळाडूंना वर्षाचे ५० लाख, ब श्रेणीच्या खेळाडूंना वर्षाचे ३० लाख आणि क श्रेणीच्या खेळाडूंना १० लाख रुपये दिले जाणार आहेत.

अ श्रेणीमध्ये टी-२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, स्म्रिती मंधाना आणि पुनम यादव यांना स्थान मिळाले आहे. तर ब श्रेणीमध्ये वनडे आणि कसोटी संघाची कर्णधार मिताली राज, झुलन गोस्वामी, दीप्ती शर्मा, पुनम राऊत, राजेश्वरी गायकवाड, शेफाली वर्मा, राधा यादव, शिखा पांडे, तानिया भाटिया आणि जेमिमा रोड्रिग्ज यांचा समावेश आहे. तसेच क श्रेणीमध्ये मानसी जोशी, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, हरलीन देओल, प्रिया पूनिया आणि रीचा घोष यांना स्थान देण्यात आले आहे.

रिचा घोषचा पहिल्यांदाच करारबद्द खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर शेफाली वर्मा, पूनम राऊत, राजेश्वरी गायकवाड यांच्या ग्रेडमध्ये वाढ झाली आहे. तसेच एकता बिष्ट, वेदा कृष्णमूर्ती, डी हेमलता आणि अनुजा पाटील हे आता करारबद्ध खेळाडू राहिले नाहीत.

महिला संघाने मागील टी-२० विश्वचषक आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तरीदेखील त्यांच्यावर दुर्लक्ष केले जात असल्याने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

इथेही भेदभाव! भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या वार्षिक कराराची घोषणा, टॉप ग्रेडच्या खेळाडूंना पुरुषांपेक्षा ६.५ कोटी कमी

काय प्रतिभा आहे! आंधळे असूनही ‘हे’ ४४ वर्षीय समालोचक त्यांच्या वाणीतून दर्शकांना करतात मंत्रमुग्ध

ब्रेकिंग! इंग्लंडनंतर भारतीय महिला संघ जाणार ‘या’ देशाच्या दौऱ्यावर, जय शहा यांनी केली घोषणा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---