---Advertisement---

स्मृती मंधानाच्या शतकानंतरही भारताच्या हाती निराशा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा व्हाईटवॉश

On: बुधवार, डिसेंबर 11, 2024 6:06 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघादरम्यान सध्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्याती भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधानानं शानदार शतक झळकावलं. सलामीवीर स्मृती मंधानाचं वनडे फॉरमॅटमधील हे नववं शतक आहे. तिनं आपल्या शतकी खेळीत 14 चौकार आणि एक षटकार लगावला. मात्र तिची ही खेळी भारतीय संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. या सामन्यात टीम इंडियाचा 83 धावांनी पराभव झाला.

स्मृती मंधानाचं ऑस्ट्रेलियातील हे दुसरं शतक आहे. मात्र शतक झळकावल्यानंतर ती जास्त वेळ क्रीजवर राहू शकली नाही. ती 105 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. विशेष म्हणजे, 2024 मधील मंधानाचं हे चौथं शतक आहे. यासह एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 4 शतकं ठोकणारी ती इतिहासातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. यापूर्वी महिला वनडे क्रिकेटमध्ये सात खेळाडूंनी एका वर्षात तीन शतकं झळकावण्याचा पराक्रम केला आहे.

या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सात वेळच्या विश्वविजेता ऑस्ट्रेलियानं आपलं वर्चस्व कायम राखलं. कांगारु संघानं पहिले दोन्ही सामने जिंकून मालिका आधीच खिशात घातली होती. तिसऱ्या सामन्यातही यजमान संघाची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं 50 षटकांत 6 गडी गमावून 298 धावा केल्या होत्या. संघाकडून ॲनाबेल सदरलँड हिनं 110 धावांची शतकी खेळी खेळली. तर ॲश्ले गार्डनर (50) आणि ताहिला मॅक्ग्रा (56*) यांनी अर्धशतक साजरं केलं. भारताकडून अरुंधती रेड्डीनं 4 विकेट घेतल्या.

प्रत्युत्तरात 299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ 215 धावांवर ऑलआऊट झाला. संघाकडून स्मृती मंधानाशिवाय एकही फलंदाज 40 धावांचा आकडाही गाठू शकली नाही. ऑस्ट्रेलियासाठी ॲश्ले गार्डनरनं फलंदाजीनंतर गोलंदाजीतही कमाल करत 5 विकेट घेतल्या. तिनं आपल्या 10 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 30 धावा दिल्या.

हेही वाचा – 

हार्दिक पांड्याची घातक गोलंदाजी, संघाची उपांत्य फेरीत धडक; मोहम्मद शमीनेही मोठा विक्रम केला!
जसप्रीत बुमराहच्या हाती निराशा, पाकिस्तानी खेळाडूनं जिंकला ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार
बाबर आझमची कसोटीपाठोपाठ टी20 संघातूनही हकालपट्टी होणार? गेल्या 10 सामन्यांतील आकडेवारी खूपच लाजिरवाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---