---Advertisement---

मितालीला आवडतात ‘हे’ पुरुष क्रिकेटपटू, सोशल मीडियावर केलं होतं जाहीर

---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने बुधवारी (दि. ०८ जून) आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतल्याचे जाहीर केले. प्रत्येक व्यक्तीला आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्यातील त्यांचा कुणीतरी नक्कीच आवडता व्यक्ती असतो. असेच काहीसे मितालीबद्दलही आहे. मितालीने ट्विटरवर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली होती. त्यावेळी मिताली भारतीय संघासोबत न्यूझीलंडमध्ये होती. दरम्यान, तिने चाहत्यांसोबत ट्वीटरवर प्रश्न उत्तराचा खेळ खेळलेला. यावेळी तिला एका चाहत्याने आवडत्या क्रिकेटपटूंची नावे विचारली. त्यावर उत्तर देताना मितालीने महिला आणि पुरुष अशा दोन्ही प्रकारांमध्ये आवडत्या खेळाडूंची नावे सांगितली होती. चला तर ती नावे जाणून घेऊया…

मितालीने ट्विटरवर चाहत्यांना प्रश्न विचारण्यास सांगितले होते. तिने पोस्टमध्ये लिहिले होते की, “विलगीकरण कालावधी संपणार आहे. चला तर मैदानात जाण्याआधी प्रश्न उत्तरांचे सत्र सुरू करू.” या खेळात एका चाहत्याने तिला प्रश्न विचारला होता की, पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंपैकी तुझे आवडते कोण आहेत? यावर उत्तर देताना मितालीने दोन्ही प्रकारांतील प्रत्येकी चार दिग्गजांची नावे सांगितली होती.

चाहत्यांच्या प्रश्नचे उत्तर मितालीने ट्वीट करून दिले. आवडत्या महिला खेळाडूंची नावे सांगताना तिने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाची माजी दिग्गज फलंदाज कॅरेन रोल्टन आणि भारताची माजी क्रिकेटपटू नीतू डेविड यांची नावे लिहिली. त्यानंतर सध्या मैदानावर खेळत असलेल्या इंग्लंडच्या कॅथरिन ब्रंट आणि ऑस्ट्रेलियाची कर्णधार मॅग लँगिग या दोघींची नावेही लिहिली. पुरुषांच्या यादीत मितालीने सर्वप्रथम भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे नाव लिहिले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंंटिंग आणि मायकल बेवन यांनाही यादीत सामील केले. मितालीच्या आवडत्या पुरुष खेळाडूंमध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील सहभागी आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---