---Advertisement---

हरमनप्रीतच्या झुंजार शतकी खेळीमुळे रोमांचक सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर २ धावांनी विजय

On: रविवार, फेब्रुवारी 27, 2022 4:36 PM
Indian-Women-Team
---Advertisement---

येत्या मार्च महिन्यापासून भारतीय महिला क्रिकेट संघाला न्यूझीलंडमध्ये आयसीसी महिला विश्वचषक २०२२ (ICC T20 World Cup 2022) खेळायचा आहे. तत्पूर्वी भारतीय संघ सराव सामने खेळून विश्वचषकाची तयारी करतो आहे. नुकताच रविवारी (२७ फेब्रुवारी) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सराव सामना (Women ODI World Cup Warm Up Match) पार पडला. भारतीय संघाने २ धावांनी हा रोमांचक सामना जिंकला. 

या सामन्यात भारताच्या २४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ निर्धारित ५० षटकांत २४२ धावाच करू शकला. दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार सूने लूस हिने सर्वाधिक ८६ धावा केल्या. ९८ चेंडूंचा सामना करताना ६ चौकारांच्या मदतीने तिने या धावा जोडल्या होत्या. तसेच सलामीवीर लॉरा वॉल्वार्ड्टने ९५ चेंडूंमध्ये ८३ धावांची शानदार खेळी केली होती. या खेळीदरम्यान तिने २ षटकार आणि ७ चौकार मारले होते.

या डावात भारताकडून राजेश्वरी गायकवाडने शानदार गोलंदाजी प्रदर्शन केले होते. तिने १० षटके गोलंदाजी करताना ४६ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. तर मेघना सिंग, स्नेह राणा आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी एता फलंदाजाला बाद केले होते.

तत्पूर्वी भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २४४ धावा जोडल्या होत्या. हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) च्या शतकी खेळीचे यामध्ये मोठे योगदान होते. एका बाजूने कमी धावसंख्येवर भारतीय फलंदाज बाद होत असताना हरमनप्रीतने चिवट खेळी खेळली. तिने ९ चौकारांच्या मदतीने १०३ धावांची शानदार खेळी खेळली. या खेळीसाठी तिने ११४ चेंडू घेतले. तसेच सलामीवीर यस्तिका भाटिया हिनेही अर्धशतक केले होते. तिने ५८ धावांचे योगदान दिले होते.

भारताच्या डावादरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या अयाबोंगा खाकाने जबरदस्त गोलंदाजी केली. तिने २३ धावा देताना या विकेट्स घेतल्या होत्या. तसेच शबनीम इस्माईल, मसाबाता क्लास, कर्णधार सुने लूस आणि क्लो ट्रायॉन यांनीही एक विकेट घेतली होती.

भारतीय संघाला बसला धक्का
या सामन्यादरम्यान भारताची सलामीवीर फलंदाज स्म्रीती मंधाना दुखापतग्रस्त झाल्यामुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे. ती सलामीला फलंदाजी करत असताना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाचा बाउंसर तिच्या डोक्याला लागला होता. ज्यामुळे ती रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर परतली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

कॉफी घेणार का? हिमाचलच्या थंडीची सामन्यादरम्यान कर्णधार रोहित लुटतोय मजा, पाहा व्हिडिओ

भारत वि. श्रीलंका तिसऱ्या टी२०त पाऊस आणणार व्यत्यय? जाणून घ्या कशी असेल खेळपट्टी

तिसऱ्या टी२०साठी ‘अशी’ असू शकते भारताची ‘प्लेईंग ११’, इशान किशनऐवजी मयंक अगरवालची होऊ शकते निवड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---